तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ४ दलालांना अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:10+5:302021-03-13T04:11:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोतीबाग रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध १० आणि ११ मार्चला अभियान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोतीबाग रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध १० आणि ११ मार्चला अभियान राबवले. या अभियानात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ४ दलालांना अटक करण्यात आली.
रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत वर्धमान नगरात शाहरुख फिरोज याच्याकडून ७ जुनी तिकिटे (४,२६९ रुपये) आणि मोबाईल जप्त करण्यात आला. अमरावती मार्गावर बाजारगाव येथे उषा बिसेन यांच्या चमूने ३ दलालांविरुद्ध कारवाई केली. यात तुषार जुनघरेकडून ४ आयडीच्या माध्यमातून १३ जुनी आणि ७ लाईव्ह तिकिटे जप्त करण्यात आली. पवनकुमार चौहान याच्याकडून ७ जुनी तिकिटे, संगणक, मोबाईल आणि ५५० रुपये जप्त करण्यात आले. शुभम राऊत याच्याकडून ३ जुनी आणि २ लाईव्ह तिकिटे, संगणक जप्त करण्यात आला. या चारही आरोपींविरुद्ध रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारगाव येथील ३ प्रकरणांचा तपास उषा बिसेन आणि वर्धमाननगर येथील प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक बी. के. सिंह करत आहेत. ही कारवाई निरीक्षक गणेश गरकल, उपनिरीक्षक उषा बिसेन, बी. के. सिंह, हेडकॉन्स्टेबल के. ए. अंसारी, कॉन्स्टेबल विजय विठोले, बंसी हलमारे, राजू पेशने यांनी केली.
.............