नव वर्षात आपली बसच्या ताफ्यात ४० ई-बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:10+5:302020-12-15T04:25:10+5:30
नागपूर : केंद्र सरकारच्या अवजवड उद्योग मंत्रालयातर्फे कर्जस्वरूपात १०० इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी निधी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने नाकारला ...
नागपूर : केंद्र सरकारच्या अवजवड उद्योग मंत्रालयातर्फे कर्जस्वरूपात १०० इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी निधी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने नाकारला होता. त्यानंतर झालेल्या सामंजस्य करारानुसार केंद्र सरकारने मनपाला ४० ई-बसेस खरेदीसाठी १४.४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. अनुदानाच्या स्वरूपातील या निधीतून ३.६० कोटींचा पहिला हप्ताही दिला आहे. नवीन वर्षात या बस आपली बसच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
करारानुसार अवजड उद्योग मंत्रालयाने मिडी, स्टॅण्डर्ड आणि मिनी बस खरेदीसाठी अनुक्रमे ४५ लाख, ५५ लाख आणि ३५ लाख देण्याची तयारी दर्शविली. यातील मिडी बस खरेदीसाठी मनपाने सकारात्मकता दाखविली. या ४० मिडी बसेस तेलंगणा येथे तयार झालेल्या आहेत. ही ओलेक्ट्रा बस १.४९ कोटीची आहे.
या कंपनीने मनपाला बस संचालनाची तयारीही दर्शविली होती. मनपा यासाठी कंपनीला ४० बसच्या मूळ किमतीसह प्रति किलोमीटर ६६.३० पैसे देण्यास तयार झाली. त्यामुळे कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक न करता मनपाला ही सेवा देता येणे शक्य होणार आहे. पहिल्या टप्यात २०२१ मध्ये २० इलेक्ट्रिक बस शहरात दाखल होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ७.२० कोटींचा निधी बसेस आल्यावर देण्यात येणार आहे.