'आपली बस'च्या ताफ्यात लवकरच ४० इलेक्ट्रीक बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:15 PM2019-12-17T23:15:29+5:302019-12-17T23:16:40+5:30

केंद्रीय नीती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. पहिल्या टप्प्यात यातील ४० बस लवकरच ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होत आहे.

40 electric buses in the troupe of 'Apali bus' soon | 'आपली बस'च्या ताफ्यात लवकरच ४० इलेक्ट्रीक बस

'आपली बस'च्या ताफ्यात लवकरच ४० इलेक्ट्रीक बस

googlenewsNext
ठळक मुद्देमहिन्याला एक कोटींचा खर्च वाढणार : महापौरांचे निविदा काढण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय नीती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. पहिल्या टप्प्यात यातील ४० बस लवकरच ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होत आहे. १५ दिवसात याबाबतच्या निविदा काढण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रयत्नशील आहेत. यातूनच महापालिकेने इलेक्ट्रीक बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रीक बस खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक बोजा पडणार नाही. संबंधित बस ऑपरेटरलाच या बस खरेदी करावयाच्या आहेत. मात्र असे असले तरी बस संचालनाचा खर्च महापालिकेला करावयाचा. यामुळे दर महिन्याला एक कोटींचा खर्च वाढणार आहे. महापालिका आपली बस संचालनावर दर महिन्याला सात कोटी खर्च करते. यात पुन्हा एक कोटीची भर पडणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौर संदीप जोशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. जोशी यांनी ४० बससाठी निविदा काढण्याचे निर्देश दिले.
इलेक्ट्रीक बसमुळे महापालिकेला प्रति किलोमीटर खर्च कमी येईल. त्यामुळे डिझेल बसवर होणाऱ्या खर्चात इलेक्ट्रीक बस चालविणे शक्य आहे. मनपाच्या आपली बसच्या ताफ्यात महिलांसाठी इलेक्ट्रिकवर संचालित पाच तेजस्विनी बस यापूर्वीच दाखल झालेल्या आहेत. शहरातील वर्दळीच्या मार्गावर या बसेस धावत आहेत. यामुळे महिलांना चांगली सुविधा झाली आहे. आता पुन्हा ४० इलेक्ट्रीक बस धावणार आहेत.

खासगी बस शहराबाहेर रोखणार
शहरात होत असलेली वाहतूक कोंडी विचारात घेता खासगी बस शहराबाहेर रोखण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. यासाठी शहराबाहेर वाडी, बुटीबोरी व भंडारा रोड येथे महापालिका जागा उपलब्ध करणार आहे. या ठिकाणाहून प्रवाशांना शहरात येण्यासाठी आपली बस उपलब्ध राहील. यादृष्टीने बसचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्याला मदत हाईल. याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

Web Title: 40 electric buses in the troupe of 'Apali bus' soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.