४० हजार हॉकर्स करणार भीक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2016 03:09 AM2016-03-20T03:09:02+5:302016-03-20T03:09:02+5:30

पर्यायी व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत हॉकर्सना इतरत्र हटविण्यात येऊ नये, त्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्यावा, ...

40 thousand Hawkers will begging movement | ४० हजार हॉकर्स करणार भीक मांगो आंदोलन

४० हजार हॉकर्स करणार भीक मांगो आंदोलन

googlenewsNext

प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटले : नव्याने नोंदणी करण्याचे आश्नासन
नागपूर : पर्यायी व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत हॉकर्सना इतरत्र हटविण्यात येऊ नये, त्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्यावा, या मागणीसाठी शहरातील ४० हजार हॉकर्स रविवारी शहरात भीक मांगो आंदोलन करतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी दिला.
आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात शहरातील हॉकर्सच्या शिष्टमंडळाने शनिवारी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. दोन तास घेराव घातला. यावेळी झालेल्या चर्चेत शहरात नागपूर महापालिकेकडे १० झोनमध्ये ३४,३१७ हॉकर्स आहेत. यात धंतोली ४०७२, लक्ष्मीनगर २५३९, सतरंजीपुरा ३३८५, नेहरूनगर ३१९०, आशीनगर ३३५५, हनुमाननगर ४७१६, लकडगंज ३५७५, मंगळवारी ३३६९, धरमपेठ २९८८ आणि गांधीबाग झोनमध्ये ३१३० अशी हॉकर्सची नोंदणी आहे. परंतु महानगरपालिकेमध्ये अजूनपर्यंत हॉकर्स धोरण तयार झालेले नाही. त्याची चर्चा मनपा सभागृहामध्येसुद्धा नाही. व्हेंडिंग कमिटीची बैठकसुद्धा झाली नाही. व्हेंडिंग कमिटीच्या सदस्यांना जागा दाखविली नाही. ४० हजार हॉकर्सपैकी १८०० हॉकर्सची नोंदणी करण्यात आली. सर्वांकडून ६२ लाख रुपये जमा करण्यात आले. परंतु त्यांच्यासाठी पाणी, वीज, शौचालय आदींची व्यवस्था करण्यात आली नाही. प्रत्येक रविवारी हॉकर्स बर्डी तसेच इतर ठिकाणी व्यवसाय करतात. जी व्यवस्था दाखविली तिथे पाणी नाही. शौचालय नाही. वीज नाही. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न हॉकर्सच्या शिष्टमंडळाने उपस्थित केला. यावेळी नव्याने नोंदणी करण्याचे आश्नासन देण्यात आले. यानंतर हॉकर्सच्या शिष्टमंडळाने यावेळी सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांचीही भेट घेतली. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात गोपी अंभोरे, अविनाश तिरपुडे, प्रमोद मिश्रा, संदीप शाहू, विजू ढगे, प्रशांत खोडे, विनोद खोडे, श्याम मेश्राम, रेखा डोये, चंदू अग्रवाल, नरेश ढगे, रज्जाक कुरेशी, अनिल अंभारे, जावेद अन्सारी, इफ्तेखार लीडर, जाकीर अहमद, राजेश जवंजाळकर, संदीप मेंढे, जहरूभाई आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: 40 thousand Hawkers will begging movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.