मधुमेह असलेल्या ४० ते ५० टक्के लोकांना लैंगिक समस्या!

By सुमेध वाघमार | Published: June 5, 2024 07:24 PM2024-06-05T19:24:26+5:302024-06-05T19:24:48+5:30

कामेच्छा केंद्रावर होतो परिणाम होतो : हॅलो डायबेटिस आंतरराष्ट्रीय परिषद

40 to 50 percent of people with diabetes have sexual problems! | मधुमेह असलेल्या ४० ते ५० टक्के लोकांना लैंगिक समस्या!

40 to 50 percent of people with diabetes have sexual problems!

सुमेध वाघमारे 
नागपूर :
मधुमेह नियंत्रित नसल्यास किंवा बराच कालावधीपासून हा आजार असलेल्या जवळपास ४० ते ५० टक्के लोकांमध्ये लैंगिक समस्या येऊ शकते. मधुमेहामुळे ‘प्रोलॅक्टिन’ रसायन वाढते. तसेच पुरुषत्वाचा ‘सेक्स हॉर्मोन’ ‘टेस्टोस्टेरॉन’ही कमी होत जाते. परिणामी, कामेच्छा केंद्रावर परिणाम होऊन ती भावना हळूहळू कमी होते. मधुमेहींच्या कामसंबंधांमध्ये अंतर पडत जाते. दाम्पत्यांच्या संबंधांवरही विपरीत परिणाम होतो. यावर उचपार आहेत. परंतु अनेक रुग्ण लैंगिक समस्या सांगत नाही आणि अनेक डॉक्टरही त्यांना विचारीत नाही, अशी खंत मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी व्यक्त केली.
 

‘हॅलो डायबेटिस’ आंतरराष्टÑीय परिषद नागपुरात ७ जूनपासून होऊ घातली आहे. त्याची माहिती देणसाठी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. गुप्ता बोलत होते. यावेळी ‘डीएआय’चे डॉ. अमोल मेश्राम, आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता उपस्थित होत्या. डॉ. गुप्ता म्हणाले, सुनील डायबिटीज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमीटेड, डायबेटिस केअर फाऊंडेशन आॅफ इंडिया, डायबेटिस असोसिएशन आॅफ इंडिया (डीएआय) नागपूर यासह इतरही संस्थांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाºया या परिषदेत सात कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यात  लैंगिक बिघडलेले कार्य या विषयावर भर दिला जाणार आहे. या शिवाय, डायबेटिक फूट, इन्सुलिन इंजेक्शनचे तंत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, न्यूट्रिशियन आणि केवळ महिला डॉक्टरांसाठी व्यायाम या विषयावर कार्यशाळा होणार आहे. परिषदेत, पाच पद्मश्री डॉक्टरांचा सहभागही राहणार आहे. 

लग्नापूर्वी मधुमेहाची चाचणी आवश्यक
डॉ. गुप्ता म्हणाले, लग्नापूर्वी जसे आपण सिकलसेल, थॅलेसेमियाची चाचणीवर भर देतो तशीच मधुमेहाची तपासणी करायला हवी. कारण, पाश्चात्य देशाच्या तुलनेत आपल्याकडे १० वर्षांआधी मधुमेहाचे निदान होते. अलिकडे मुली उशीरा लग्न करत असल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. त्यात गर्भ राहिल्यास त्याचे निदान होण्यासही उशीर होतो. परिणामी, होणारे बाळ व्यंग घेऊन जन्माला येण्याचे, प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण होण्याची, गर्भातच बाळाचा मृत्यू होण्याचे किंवा कमी दिवसांचे बाळ जन्माला येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी लग्नापूर्वी मधुमेहाची चाचणी आवश्यक आहे. लग्नापूर्वी मधुमेहाचे निदान झाल्यास योग्य उपचाराचा मदतीने निरोगी बाळाला जन्म देण्यास मदत होते. 

८५ टक्के पुरुषांना, ६३.३ टक्के महिलांना लैंगिक दोष 
‘‘टाईप २’ मधुमेहाच्या स्त्रीयांमध्ये लैंगिक संबंधातील अडथळे यावर शोधनिबंध सादर केला होता. यात १००३ पुरुषांमध्ये तब्बल ८५ टक्के पुरुषांना, तर २६४ महिलांमध्ये ६३.३ टक्के महिलांना लैंगिक दोष असल्याचे आढळून आले, अशी माहितीही डॉ. गुप्ता यांनी दिली.

Web Title: 40 to 50 percent of people with diabetes have sexual problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.