ग्रामीणमधील लसीकरणासाठी आले ४० हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:22+5:302021-09-02T04:15:22+5:30
नागपूर : ग्रामीण भागातील लसीकरणासाठी जिल्हा परिषदेला ५८ हजार लसींचा पुरवठा झाला असून, त्यापैकी ४० हजार डोस विशेष लसीकरण ...
नागपूर : ग्रामीण भागातील लसीकरणासाठी जिल्हा परिषदेला ५८ हजार लसींचा पुरवठा झाला असून, त्यापैकी ४० हजार डोस विशेष लसीकरण मोहिमेसाठी उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्यातील १५० लसीकरण केंद्रावर ही व्यवस्था केली जाणार आहे.
९ लाख ५४ हजार २५१ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, ही टक्केवारी ६८.४२ आहे. तर दुसरा डोस २ लाख ९० हजार ९५२ नागरिकांनी घेतला आहे. ही टक्केवारी फक्त २०.८६ आहे. ग्रामपंचायतस्तरावरसुद्धा लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजारी केंद्रापर्यंत जाणे शक्य नसणाऱ्यांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध आहे.
...
पहिल्या डोसची टक्केवारी
तालुका : टक्केवारी
पारशिवनी : ७६.४० टक्के
कळमेश्वर : ८५.२० टक्के
भिवापूर : ७४.७५ टक्के
नागपूर ग्रामीण : ७१.२० टक्के
नरखेड : ७०.५५ टक्के
सावनेर : ६७.२३ टक्के
रामटेक : ५५.१३ टक्के
मौदा : ६१.२६ टक्के
कुही : ६२.९८ टक्के
काटोल : ६९.९२ टक्के
कामठी : ६२.०३
...
कोट
लसीकरण मोहिमेंतर्गत उमरेड तालुक्यात १०० टक्के पात्र नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३० टक्के आहे. जिल्ह्यात पहिला डोस घेणारे ६२.०३ टक्के नागरिक असून, दुसरा डोस घेणारे फक्त २०.८६ टक्के आहेत. यामुळे पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनी दुसरा डोससुद्धा या विशेष मोहिमेत घ्यावा. लोकप्रतिनिधी व सरपंच यांनी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे.
- योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर
...