दुचाकीच्या डिक्कीतून राेख ४० हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:09 AM2021-03-16T04:09:19+5:302021-03-16T04:09:19+5:30
भिवापूर : चाेरट्याने दुचाकीच्या डिक्कीचे कुलूप ताेडून तेथील राेख ४० हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे चाेरून नेली. ही घटना ...
भिवापूर : चाेरट्याने दुचाकीच्या डिक्कीचे कुलूप ताेडून तेथील राेख ४० हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे चाेरून नेली. ही घटना भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शुक्रवारी (दि.१२) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
शामराव बाबुराव कामडी (३५, रा. तास, ता. भिवापूर) हे भिवापूर कृउबास येथे अडतिया असून, शुक्रवारी ते काही कामानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीत आले हाेते. दरम्यान, त्यांनी बाजार समितीसमाेर दुचाकी उभी करून ते कार्यालयात गेले असता, अज्ञात चाेरट्याने दुचाकीच्या डिक्कीचे कुलूप ताेडून तेथील राेख ४० हजार रुपये तसेच बँकेचे पासबुक, श्रीकृष्ण बँकेचे दाेन चेकबुक, बाजार समितीचे कास्तकार बुक व बिल बुक अशी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन पाेबारा केला. दरम्यान, अर्ध्या तासानंतर कामडी दुचाकीजवळ आले असता, त्यांना डिक्कीचे कुलूप तुटलेले आढळून आले. लागलीच त्यांनी पाेलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा तपास पाेलीस हवालदार चंद्रकांत रेवतकर करीत आहेत.