४०५ नव्या रुग्णांची वाढ, ३६३ बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:27+5:302020-12-08T04:08:27+5:30
नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आता तीन आठवड्यांचा कालावधी होऊनही रुग्णांची संख्या ...
नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आता तीन आठवड्यांचा कालावधी होऊनही रुग्णांची संख्या ४०० ते ५०० दरम्यान स्थिर आहे. सोमवारी ४०५ नव्या रुग्णांची भर तर १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १,१४,९३१ झाली असून मृतांची संख्या ३,७४८वर पोहचली. आज ३६३ रुग्ण बरे झाले.
नागपूर जिल्ह्यात दिवाळीनंतर रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती. परंतु नंतर ५३६ वर रुग्णसंख्या गेली नाही. यातच मृतांचा आकडाही १५च्या आत स्थिर राहिला. मात्र थंडी व प्रदूषण वाढल्यास रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३५०, ग्रामीणमधील ५० तर जिल्ह्याबाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ७, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील ५ आहेत. विशेष म्हणजे, आज चाचण्यांच्या संख्येत घट आली. २,३५५ आरटीपीसीआर तर १,३०२ रॅपिड ॲन्टिजेन असे मिळून ३६५७ चाचण्या झाल्या. शहरात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ८३,५२३, ग्रामीणमध्ये २१,९९४ अशी एकूण १,०५,५१७ वर गेली आहे. सध्या ५,६६६ कोरोनाबाधित रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
-प्रदूषण वाढल्यास प्रादुर्भावाचा धोका
तापमानात घट होऊन प्रदूषण वाढल्यास प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु सिरो सर्वेक्षणात शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात ॲन्टिबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नागपूरकरांची ‘हर्ड इम्युनिटी’ वाटचाल असल्याने धोका वाढला तरी त्याची तीव्रता कमी असेल, असेही बोलले जात आहे.
::कोरोनाची आजची स्थिती
-दैनिक संशयित : ३,६५७
-बाधित रुग्ण : १,१४,९३१
_-बरे झालेले : १,०५,५१७
- उपचार घेत असलेले रुग्ण : ५,६६६
- मृत्यू : ३,७४८