नागपुरात ४१ महिन्यात ७५ हजार लोकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 10:08 PM2020-11-23T22:08:16+5:302020-11-23T22:12:26+5:30

Dogs bites cases, nagpur news एप्रिल २०१७ पासून ४१ महिन्याच्या कालावधीत शहरातील ७५ हजाराहून अधिक लोकांना भटक्या व पाळीव श्वानांनी दंश केला. त्यातील ४६ टक्के दंश हे पाळीव श्वानांनी केलेले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

In 41 months, 75,000 people were bitten by dogs in Nagpur | नागपुरात ४१ महिन्यात ७५ हजार लोकांना श्वानदंश

नागपुरात ४१ महिन्यात ७५ हजार लोकांना श्वानदंश

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये प्रकरणात घट , पाळीव श्वानांकडून ४६ टक्के दंश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – उपराजधानीतील अनेक मार्गांवर भटक्या श्वानांच्या टोळ्या दिसून येतात व त्यांची अक्षरशः दहशत असते. मात्र शहरातील पाळीव कुत्रीदेखील याबाबतीत मागे नाही. एप्रिल २०१७ पासून ४१ महिन्याच्या कालावधीत शहरातील ७५ हजाराहून अधिक लोकांना भटक्या व पाळीव श्वानांनी दंश केला. त्यातील ४६ टक्के दंश हे पाळीव श्वानांनी केलेले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. २०१७-१८ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत नागपुरातील किती लोकांना भटके श्वान चावले, इतर प्राण्यांचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०२० या ४१ महिन्याच्या कालावधीत शहरातील एकूण ७५ हजार ५८७ नागरिकांना श्वानदंश झाला. यातील ३५ हजार ४९४ पाळीव तर ४० हजार ९३ श्वान हे भटके होते. सर्वाधिक ३२ हजार ४७५ दंश २०१८-१९ या एका वर्षात झाले.

लॉकडाऊनमध्ये ८३२ प्रकरणे

लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक आठवडे शहरातील रस्त्यावर सामसूमच होती. त्यामुळे भटक्या श्वानांच्या हल्ल्याचे प्रमाण प्रचंड घटले. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत श्वानदंशाची ८३२ प्रकरणे घडली. त्यातील ४२१ दंश भटक्या श्वानांकडून झाले.

वर्षनिहाय श्वानदंश

वर्ष - भटके श्वान - पाळीव श्वान - एकूण

२०१७-१८ - ५,३८९ - ४,४७१ - ९.८६०

२०१८-१९ - १७,०३२ - १५,४४३ - ३२,४७५

२०१९-२० - १७,२५१ - १५,१६९ - ३२,४२०

२०२० (सप्टेंबरपर्यंत)- ४२१ - ४११ - ८३२

Web Title: In 41 months, 75,000 people were bitten by dogs in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.