डिजिटल लॉक तोडून ४.१५ लाखांच्या मुद्देमालावर डल्ला
By दयानंद पाईकराव | Published: November 16, 2023 02:00 PM2023-11-16T14:00:02+5:302023-11-16T14:00:35+5:30
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : घराच्या दाराचे आणि आलमारीचे डिजिटल लॉक तोडून अज्ञात आरोपीने सोन्याचे दागीने आणि रोख असा ४.१५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास घडली.
स्वरुप सतिश रेगुडवार (वय ४३, रा. एम्प्रेस मिल सोसायटी, श्रीनगर अजनी) हे बुधवारी रात्री आपल्या घराला डिजिटल लॉक लाऊन जेवन करून झोपले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे डिजिटल लॉक तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील गोदरेज आलमारीचे डिजिटल लॉक तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागीने व रोख २ लाख ३० हजार ३०० रुपये असा एकुण ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी रेगुडवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक स्वाती माळी यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.