महापौर करंडक राज्यस्तरीय स्पर्धेत ४२ एकांकिका
By admin | Published: July 3, 2016 02:49 AM2016-07-03T02:49:19+5:302016-07-03T02:49:19+5:30
नागपूर महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने महापौर करंडक
आज सुरुवात : राज्यभरातील नामांकित संस्थांचा सहभाग
नागपूर : नागपूर महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ३ ते १० जुलै २०१६ दरम्यान सायंटिफिक सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. यात ४२ एकांकिका सादर केल्या जाणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, स्थापत्य समितीचे सभापती सुनील अग्रवाल, आरोग्य सभापती देवेंद्र मेहर, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
रविवारी सकाळी ९.३० वाजता महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. विशेष अतिथी म्हणून नाट्य व चित्रपट अभिनेता तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर उपस्थित राहतील. यावेळी अमदार अनिल सोले, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, आमदार प्रकाश गजभिये, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे व कृष्णा खोपडे, उपमहापौर सतीश होले, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतील.
या स्पर्धेची सुरुवात प्राथमिक फेरीने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २६ जून २०१६ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात झाली. महापौर एकांकिका स्पर्धा ही विविध एकांकिका स्पर्धातून १ जानेवारी २०१३ ते या स्पर्धेच्या प्रवेशिकेची अंतिम मुदत २५ जून २०१६ या कालावधीत पारितोषिक प्राप्त अव्वल ठरलेल्या एकांकिकांची स्पर्धा आहे. परंतु नागपूसह विदर्भात नवीन व दमदार कलाकृ तींना संधी मिळावी. यासाठी प्राथमिक स्पर्धेतून १२ एकांकिकांची निवड करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून अव्वल ठरलेल्या प्रारितोषिकप्राप्त प्रवेश घेतलेल्या एकांकिका ३० संस्थांच्या आहेत. अशा एकूण ४२ एकांकिका सादर करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी यांनी दिली.
प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत १० जुलैला रात्री ८ वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा व समारोप केला जाणार आहे. या स्पर्धेचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन क्र ीडा व सांस्कृतिक सभापती हरीश दिकोंडवार, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, सभापती सुमित्रा जाधव, प्रमोद भुसारी, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)