केंद्रीय जीएसटी विभागात ४२,१३१ पदे रिक्त, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 26, 2023 03:08 PM2023-04-26T15:08:27+5:302023-04-26T15:12:01+5:30

नागपूर झोनमध्ये जागांचा समावेश : थकबाकी वाढली, वसुली थांबली  

42,131 Vacancies in Central GST Department, Work Stress on Employees | केंद्रीय जीएसटी विभागात ४२,१३१ पदे रिक्त, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

केंद्रीय जीएसटी विभागात ४२,१३१ पदे रिक्त, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

googlenewsNext

नागपूर : देशात केंद्रीय वस्तू व सेवा कराचे (सीजीएसटी) संकलन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात रोजगार वाढविण्याची घोषणा करतात, तर दुसरीकडे विविध शासकीय विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. देशात सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागात रिक्त पदांची संख्या जवळपास ४५ टक्के आहे. या संदर्भातील डाटा केंद्रीय अप्रत्यक्ष कर बोर्डाने १ एप्रिलला वेबसाइटवर प्रकाशित केला आहे.

प्रकाशित आकडेवारीनुसार संपूर्ण देशात केंद्रीय जीएसटी व सीमा शुल्क विभागात ९१,७४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९,६१३ पदांवर कर्मचारी कार्यरत असून ४२,१३१ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.

नागपूर झोनमध्ये रिक्त पदे वाढली

रिक्त पदांमध्ये नागपूर झोनची स्थितीसुद्धा खराब आहे. नागपूर झोनमध्ये १,५७० पदे मंजूर आहेत. त्यामध्ये ८४४ पदांवर कर्मचारी कार्यरत असून ७२६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण वाढला आहे. फेक इन्व्हाईस अर्थात कोट्यवधींच्या करचोरीची प्रकरणे वाढली आहेत. त्याचा तपास आणि करचोरट्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे थकबाकी वाढून वसुलीवर विपरित परिणाम होत आहे. विभागात किमान ७० ते ८० टक्के कर्मचारी कार्यरत राहिल्यास महसुलात आणखी वाढ होणार असल्याचे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मत आहे.

देशात विभागातील पदांची स्थिती

ग्रुप - मंजूर - कार्यरत - रिक्त
ग्रुप ह्यएह्ण ६,३९५ - ३,४९४ - २,९०१
ग्रुप ह्यबीह्ण गॅझेटेड - २२,२१९ - १८,२०६ - ४,९१३
ग्रुप ह्यबीह्ण नॉन गॅझेटेड - ३२,३४५ - १५,८९२ - १६,४५३
ग्रुप ह्यसीह्ण - ३०,७८५ - १२,०२१ - १८,७६४
एकूण - ९१,७४४ - ४९,६१३ - ४२,१३१

नागपूर झोनमधील पदांची स्थिती

पदनाम - मंजूर - कार्यरत - रिक्त
मुख्य आयुक्त कार्यालय १२६ - ४५ - ८१
अपील नागपूर - ३२ - १३ - १९
ऑडिट नागपूर - १४२ - ७३ - ६९
नागपूर - १ - २५२ - १५५ - ९४
नागपूर - २ - २२० - १३१ - ८९
नाशिक - २५५ - १६२ - ९६
अपील नाशिक - ४५ - १४ - ३१
ऑडिट नाशिक - १७६ - ९६ - ८०
औरंगाबाद - २४१ - १४६ - ९५
सेझ - ८१ - ९ - ७२
१५७० ८४४ ७२६

कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला

दहा वर्षांपासून रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक केसेस पेडिंग आहेत. कोट्यवधींची थकबाकी आहे. पंतप्रधानांच्या विशेष भरतीने काही फरक पडला नाही. जीएसटी कलेक्शनची माहिती लोकांना कळते, पण करचोरीची माहिती कुणालाही कळत नाही. याची चौकशी व्हावी. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

- संजय थूल, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम्स, सेंट्रल एक्साईज अ‍ॅण्ड जीएसटी एससी/एसटी एम्पॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशन.

Web Title: 42,131 Vacancies in Central GST Department, Work Stress on Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.