२७ उमेदवारांनी भरले ४३ अर्ज, आज नामनिर्देशनपत्रांची छाननी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:25 AM2023-01-13T10:25:38+5:302023-01-13T10:31:51+5:30

नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणूक : १६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार

43 applications filled by 27 candidates for Nagpur division teachers constituuency, scrutiny of nomination papers today | २७ उमेदवारांनी भरले ४३ अर्ज, आज नामनिर्देशनपत्रांची छाननी

२७ उमेदवारांनी भरले ४३ अर्ज, आज नामनिर्देशनपत्रांची छाननी

Next

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी १६ उमेदवारांनी २४ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. या निवडणुकीसाठी एकूण २७ उमेदवारांनी ४३ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये शिक्षक मतदार संघासाठी ५ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली. गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.

१३ जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. ही छाननी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तळमजल्यावर सभा कक्ष क्र. १ मध्ये सकाळी ११ वाजता पासून होणार आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.

उमेदवारांना १६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया संपणार आहे.

निवडणूक निरीक्षक अरुण उन्हाळे नागपुरात दाखल

विधान परिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकविषयक कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून अरुण उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदान क्षेत्रात मुक्कामी राहून निवडणूक संदर्भातील देखरेख व निरीक्षण याविषयीचे कामकाज पाहणार आहे. त्यांना सकाळी ९.३० ते १०.३० या कालावधीत निवडणुकीसंदर्भातील अडचणींसाठी भेटता येणार आहे.

निवडणूक निरीक्षक अरुण उन्हाळे रवी भवन येथील कुटीर क्रमांक ७ मध्ये निवासी असून, निवडणुकीसंदर्भात त्यांना भेटता येईल. त्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणारेकर यांना नियुक्त करण्यात आले आहे.

- अर्ज भरणारे उमेदवार उमेदवारांचे नाव - भरलेले अर्ज

  • रामराव ओंकार चव्हाण - ३
  • सुधाकर गोविंदराव अडबाले -२
  • मृत्युंजय विक्रमादित्य सिंह - २
  • राजेंद्र बाबूराव झाडे - २
  • अजय विठ्ठलराव भोयर - २
  • दीपराज अंबादास खोब्रागडे -१
  • इंजि. प्रो. सुषमा सुधाकर भड - १
  • रवींद्रदादा ऊर्फ अरुण डोंगरदेव - १
  • बाबाराव तातोबा उरकुडे - १
  • विनोद तुळशीराम राऊत - २
  • सतीश गंगाधर जगताप - २
  • नरेंद्र भास्करराव पिंपरे - १
  • गंगाधर विश्वेश्वर नाकाडे - १
  • नागो पुंडलिक गाणार - २
  • श्रीधर नारायण साळवे - १
  • सतीश रजनितकांतजी इटकेलवार - १
  • उत्तमप्रकाश शंकर शहारे - १
  • निळकंठ दोळकू उईके - १
  • राजेंद्र लक्ष्मण बागडे - १
  • देवेंद्र चंद्रसेन वानखेडे - २
  • निमा संजय रंगारी - १
  • सचिन शंकरराव काळबांडे - १
  • प्रवीण शंकरराव गिरडकर १
  • अतुल मधुकरराव रूईकर - १
  • मुकेश श्रीपतराव पुडके - ४
  • संजय शामराव रंगारी १
  • नरेश लक्ष्मणराव पिल्ले - ४

- अमरावती पदवीधर निवडणुकीत ४४ नामांकन अर्ज

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक ३० जानेवारी रोजी होत आहे. गुरुवारी नामांकन अर्द दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी १९ नामांकन अर्ज दाखल केले आहेत. तर, ५ ते १२ जानेवारी या दरम्यान आतापर्यंत ३४ उमेदवारांकडून ४४ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी नामांकन अर्जाची छाननी केली जाणार आहे.

Web Title: 43 applications filled by 27 candidates for Nagpur division teachers constituuency, scrutiny of nomination papers today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.