नोकरानेच लावला मालकाला ४३.५३ लाखांचा चुना
By योगेश पांडे | Published: July 15, 2024 05:33 PM2024-07-15T17:33:41+5:302024-07-15T17:34:51+5:30
Nagpur : तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरावर अतिविश्वास ठेवत त्याच्यावर बॅंक खात्याची सर्व जबाबदारी सोपविणे एका मालकाला चांगलेच महागात पडले. नोकराने मालकाचा विश्वासघात करत रजिस्टरमध्ये बनावट नोंदी करत ४३.५३ लाख रुपये परस्पर दुसरीकडे वळवत गंडा घातला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मनोज मोहनलाल शवकानि (४८, आंबेडकरनगर, अमरावती मार्ग) यांची बालाजी गोल्डन ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. त्यांच्याकडे मुरलीधर मालचंद आसोपा (३८, बिकानेर, राजस्थान) हा काम करतो. मनोज यांचा मुरलीधरवर अतिविश्वास होता व त्यांनी त्याच्याकडे बॅंक खात्याचे सर्व व्यवहार तसेच हिशेबाची कामे सोपविली होती. २५ मे ते २६ जून या कालावधीत मुरलीधरने कंपनीच्या रजिस्टरमध्ये बनावट नोंदी केल्या. त्यानंतर त्याने स्वत:च्या तसेच परिचितांच्या खात्यावर ४३.५४ लाख रुपये वळते केले. ही बाब समोर आल्यावर मनोज यांनी त्याला पैसे परत मागितले. मुरलीधरने पैसे तर दिलेच नाही, वरून मनोज यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. मनोज यांच्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.