नागपूर मध्यवर्ती कारागृहात मिळाले ४४ कोरोना संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 09:42 PM2020-07-01T21:42:23+5:302020-07-01T22:12:08+5:30

नागपुरात बुधवारी ७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमितांची संख्या १५७८ झाली आहे. विशेष म्हणजे यातील ४४ नमुने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील आहे. पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कैद्यांचाही समावेश आहे.

44 infected found in Nagpur Central Jail | नागपूर मध्यवर्ती कारागृहात मिळाले ४४ कोरोना संक्रमित

नागपूर मध्यवर्ती कारागृहात मिळाले ४४ कोरोना संक्रमित

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक कैदी झाले संक्रमित : दिवसभरात शहरात ७३ ची भर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नागपुरात बुधवारी ७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमितांची संख्या १५७८ झाली आहे. विशेष म्हणजे यातील ४४ नमुने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील आहे. पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कैद्यांचाही समावेश आहे. मंगळवारी कारागृहातून १५७ नमुने घेण्यात आले होते. यात काही कै द्यांचेही नमुने होते. आज रिपोर्ट आल्यानंतर कारागृहात खळबळ उडाली. कै दी संक्रमित झाल्यामुळे कारागृह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मंगळवारी अधिकाऱ्यासह नऊ कारागृहातील कर्मचारी कोरोना संक्रमित आले होते. त्यापूर्वी अस्थायी कारागृहातील एक कैदी संक्रमित झाला होता. कोरोना संक्रमित अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत कैद्यांनाही उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठविण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी सर्व कैद्यांसह १०१ अधिकारी कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले. याचा रिपोर्ट गुरुवारी येणार आहे.
नीरी लॅबमध्ये मंगळवारी कारागृहातील १५७ नमुने घेण्यात आले. त्यात ४४ नमुने पॉझिटिव्ह आले. एम्सच्या लॅबमधून १० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात लॉ कॉलेज क्वारंटाईन सेंटरचे ४, वनामती क्वारंटाईन सेंटरचे ३, तर ३ अन्य परिसरातील आहे.
मेयोच्या लॅबमधून ११ पॉझिटिव्ह मिळाले आहे. यात कामठीच्या मिलिटरी हॉस्पिटलचे पुन्हा ६ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. त्याचबरोबर मोमीनपुरा, लोहारपुरा बजेरिया, हसनबाग, विनोबा भावेनगर, काटोल व डागा रुग्णालयातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खासगी लॅबमधून आठ नमुने पॉझिटिव्ह आले आहे.

 ३८ झाले कोरोनामुक्त
नागपुरात बुधवारी ३८ रुग्ण निरोगी होऊन घरी परतले. मेयो रुग्णालयातून १६ लोकांना सुटी मिळाली. यात हंसापुरी १, बजेरिया ५, शास्त्रीनगर ३, परसोडी ४, उमरेड १, सिवनी १, लष्करीबाग १ येथील रुग्णांचा समावेश आहे. मेडिकल कॉलेजमधून १९ लोकांना डिस्चार्ज मिळाला. यात नाईक तलाव- बांगलादेशचे १०, संत गाडगेबाबा नगरातील ३, पाचपावली, हसनबाग, यवतमाळ, मोमीनपुरा, अमरावती, झिंगाबाई टाकळीतील प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे. एम्समधून ३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

Web Title: 44 infected found in Nagpur Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.