लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये स्फोटकांचे ४४० पॅकेट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:28 AM2017-09-21T01:28:28+5:302017-09-21T01:32:02+5:30

रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून ३६ किलो वजनाचे १७,६०० रुपये किमतीचे स्फोटकांचे ४४० पॅकेट जप्त करून एका आरोपीस अटक केली आहे.

 440 packets of explosives seized in Lucknow-Chennai Express | लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये स्फोटकांचे ४४० पॅकेट जप्त

लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये स्फोटकांचे ४४० पॅकेट जप्त

Next
ठळक मुद्दे आरपीएफची कारवाई : दानापूर-सिकंदराबादमध्ये दारूची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून ३६ किलो वजनाचे १७,६०० रुपये किमतीचे स्फोटकांचे ४४० पॅकेट जप्त करून एका आरोपीस अटक केली आहे. तर बुधवारी दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून दारूच्या ५,४०० रुपये किमतीच्या १९ बाटल्या जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या चमूतील सदस्य विकास शर्मा, बिक्रम यादव, किशोर चौधरी हे मंगळवारी दुपारी १.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. त्यांना प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १६०९४ लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये दोन बॅग संशयास्पद स्थितीत ठेवलेल्या आढळल्या. या बॅगबाबत विचारणा केली असता संबंधित व्यक्तीने समाधानकारक उत्तर दिले नाही.
आरपीएफने कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव अनिल माणिकचंद निगम (३८) रा. २५८, स्टेशन रोड, उन्नाव, उत्तर प्रदेश सांगितले. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यातील पॅकेटमध्ये स्फोटके असल्याचे लक्षात आले.
उत्तर प्रदेशाच्या उन्नाव येथून कोल्हापूर येथील यात्रेत दुकानदारांच्या मागणीनुसार स्फोटके नेत असल्याचे त्याने सांगितले. यात्रेत स्फोटकांचे काय काम आहे, अशी विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यास अटक करून आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. दोन्ही बॅगमधील स्फोटकांची तपासणी केली असता त्यात ३६ किलो वजनाचे ४४० पॅकेट आढळले. जप्त करण्यात आलेली स्फोटके लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दुसºया घटनेत आरपीएफचे उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, विकास शर्मा, विवेक कनोजिया, उमेश सिंह, बिक्रम यादव यांनी रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली असता गाडीची तपासणी केली. चमूला मागील जनरल कोचमध्ये एक बेवारस बॅग आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांनी या बॅगवर आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात ५,४०० रुपये किमतीच्या १९ बाटल्या आढळल्या. जप्त करण्यात आलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

Web Title:  440 packets of explosives seized in Lucknow-Chennai Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.