विदर्भात २४ तासात ४४४ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:08 AM2021-03-10T04:08:45+5:302021-03-10T04:08:45+5:30
नागपूर : विदर्भात गेल्या २४ तासात ४४४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. मंगळवारी ३,२७६ ...
नागपूर : विदर्भात गेल्या २४ तासात ४४४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. मंगळवारी ३,२७६ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ३,४९,१६० झाली आहे. आज २० रुग्णांचे जीव गेले. सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली. १३३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ६ मृत्यू झाले. नागपूरनंतर बुलडाणा जिल्ह्यात झपाट्याने रुग्ण वाढताना दिसून येत आहे. अमरावती विभागात आज सर्वाधिक रुग्णांची नोंद याच जिल्ह्यात झाली. ५७९ नवे रुग्ण व २ रुग्णांचे जीव गेले. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात ३१८ रुग्ण व २ मृत्यू, अमरावती जिल्ह्यात २८२ रुग्ण व ३ मृत्यू, अकोल्यात २६७ रुग्ण व ३ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात २१४ रुग्णांचे बळी गेले. अमरावती जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा रुग्ण ए. रुग्ण मृत्यू
नागपूर १३३८ १६०३४३ ०६
वर्धा २१४ १३७८६ ०२
गडचिरोली २७ ९७२६ ००
गोंदिया १२ १४५८२ ०१
भंडारा ४५ १४०२० ००
चंद्रपूर ८२ २४३२२ ०१
यवतमाळ ३१८ १९७४३ ०२
अमरावती २८२ ४०२६८ ०३
वाशिम ११२ १०४७० ००
अकोला २६७ १९५०० ०३
बुलडाणा ५७९ २२४०० ०२