तीन विमानातून ४५९ यात्रेकरू हजसाठी रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:23 PM2018-08-03T22:23:17+5:302018-08-03T22:26:24+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी तीन विमानातून ४५९ यात्रेकरूं हजकरिता रवाना झाले. त्यात सहा महिन्याचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आकर्षणाचे केंद्र होते.

45 9 pilgrims leave for Hajj on three aircrafts | तीन विमानातून ४५९ यात्रेकरू हजसाठी रवाना 

तीन विमानातून ४५९ यात्रेकरू हजसाठी रवाना 

Next
ठळक मुद्देशुक्रवारी विशेष विमाने : सहा महिन्याचा मुलगा आकर्षण

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी तीन विमानातून ४५९ यात्रेकरूं हजकरिता रवाना झाले. त्यात सहा महिन्याचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आकर्षणाचे केंद्र होते.
शुक्रवारी हज हाऊस नागपूरमध्ये आजमिन-ए-हजला शुभेच्छा देण्याचा क्रम निरंतर सुरू होता. महापौर नंदा जिचकार यांनी हज यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आणि सीटीसीचे अध्यक्ष हाजी अब्दुल कदीर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन महापौरांचा सत्कार केला. त्यानंतर आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, माजी खासदार गेव्ह आवारी, अशोक धवड, कृष्णकुमार पांडे, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, यशवंत बाजीराव, लाला कुरेशी, गुलाम साबरी, छत्तीसगड हज कमिटीचे अध्यक्ष सैफुद्दीन यांनीही यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.
सीटीसीचे उपाध्यक्ष शाहीद नसीम खान यांनी सांगितले की, तिसऱ्या विमानात वाहीद सगीर सिद्दीकी यांची दोन वर्षांची मुलगी इकरा आणि सहा महिन्याचा मुलगा इब्राहिम हजसाठी रवाना झाले. सीटीसीचे अध्यक्ष हाजी अब्दुल कदीर, उपाध्यक्ष शाहीद नसीम खान, सचिव हाजी मो. कलाम, सदस्य अब्दुल अजीज खान, मतीन रहमान यांनी हज हाऊसची व्यवस्था सांभाळली.

Web Title: 45 9 pilgrims leave for Hajj on three aircrafts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.