नागपुरातील ‘आयआरसी’ अधिवेशनासाठी साडेचार कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:06 AM2018-11-14T01:06:15+5:302018-11-14T01:08:38+5:30

उपराजधानीत २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ‘आयआरसी’च्या ( इंडियन रोड काँग्रेस) ७९ व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुंबई येथे हा निधी सुपूर्ददेखील करण्यात आला.

4.5 crore funds for 'IRC' convention in Nagpur | नागपुरातील ‘आयआरसी’ अधिवेशनासाठी साडेचार कोटींचा निधी

नागपुरातील ‘आयआरसी’ अधिवेशनासाठी साडेचार कोटींचा निधी

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा पुढाकार : धनादेश केला सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ‘आयआरसी’च्या ( इंडियन रोड काँग्रेस) ७९ व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुंबई येथे हा निधी सुपूर्ददेखील करण्यात आला.
नागपुरात ‘आयआरसी’च्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन चौथ्यांदा होणार आहे. ‘आयआरसी’च्या अधिवेशनासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे मुंबई येथे छोटेखानी औपचारिक कार्यक्रमात ‘आयआरसी’च्या अधिवेशनासाठी साडेचार कोटींचा निधी प्रदान करण्यात आला. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी यांना हा धनादेश सुपूर्त केला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक (लेखा) श्रीधर मच्छा, सहव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आणि डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार उपस्थित होते. अधिवेशनाचे स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार आणि आयोजन समितीचे सचिव रमेश होतवानी विविध समित्यांच्या कार्याचा आढावा घेत आहेत.

Web Title: 4.5 crore funds for 'IRC' convention in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.