नागपुरात अरुंद मार्गावर धावणार ४५ मिनी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:17 PM2019-03-11T23:17:13+5:302019-03-11T23:18:23+5:30
अरुंद रस्ते व दाट लोकवस्ती असलेल्या भागात बस वाहतूक शक्य होत नाही. स्टॅण्डर्ड व मिडी बसेस अशा भागात चालविणे शक्य होत नाही. यामुळे नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवेपासून वंचित राहावे लागत होते. याचा विचार करता महापालिकेचा परिवहन विभाग व तीन डिझेल बस ऑपरेटर यांच्यात झालेल्या करारानुसार शहरात ४५ मिनी बसेस चालविण्याला आचारसंहितेपूर्वी मंजुरी देण्यात आली. सोमवारी यासंदर्भात तीन बस ऑपरेटरला याची माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अरुंद रस्ते व दाट लोकवस्ती असलेल्या भागात बस वाहतूक शक्य होत नाही. स्टॅण्डर्ड व मिडी बसेस अशा भागात चालविणे शक्य होत नाही. यामुळे नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवेपासून वंचित राहावे लागत होते. याचा विचार करता महापालिकेचा परिवहन विभाग व तीन डिझेल बस ऑपरेटर यांच्यात झालेल्या करारानुसार शहरात ४५ मिनी बसेस चालविण्याला आचारसंहितेपूर्वी मंजुरी देण्यात आली. सोमवारी यासंदर्भात तीन बस ऑपरेटरला याची माहिती देण्यात आली.
करारानुसार तीन ऑपरेटरला प्रत्येकी १५ बसेस खरेदी करून चालवावयाच्या आहेत. परिवहन विभागाने यासाठी १८ मार्ग निश्चित केले आहेत. या मार्गावरून दररोज ७४७ बसफेऱ्या होतील. शहरातील विविध भागात दररोज ८,५८१ किलोमीटर अंतर या बसेस धावतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, जुन्या झालेल्या ४५ स्टॅण्डर्ड बसेस मिनी बसमध्ये परिवर्तित क रण्यात येतील. महापालिकेला स्टॅण्डर्ड बसच्या संचालनावर प्रति किलोमीटर ५२ रुपये खर्च करावे लागतात तर मिनी बसच्या संचालनावर प्रति किलोमीटर ३७ रुपये खर्च येणार आहे. या बसेस दाट लोकवस्तीच्या भागात तसेच बाजार भागातून जातील. यामुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल. परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी यापूर्वीच मिनी बस संचालनाला हिरवी झेंडी दिली होती. मात्र परिवहन विभागाच्या लेटलतिफीमुळे याला विलंब झाला. या बसेसमुळे महापालिके च्या खर्चात बचत होण्याची आशा आहे. एका मिनी बसची किंमत २४ लाख असल्याचे सांगण्यात आले.
करारातच ऑपरेटरांना ४५ मिनी बसेस चालविण्याची अट होती, परंतु काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे याला विलंब झाल्याचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सांगितले. बस संचालनाला आयुक्त अभिजित बांगर यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी महापालिकेवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा पडणार नाही.
मेट्रोला मदत होणार
मेट्रो रेल्वेसाठी मिनी बस फीडर बससेवेचे माध्यम ठरणार आहे. यासंदर्भात मेट्रोकडून प्रस्ताव आला होता. तेव्हा महापालिकेने ४५ मिनी बसेस चालविण्याचा निर्णय घेतला होता. मेट्रो रेल्वे काही भागात सुरू झाली आहे. मिनी बससेवेमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होण्याला मदत होणार आहे.
काही प्रस्तावित मार्ग बसफेऱ्या
बर्डी ते यशोधरानगर व नागसेनवन १२६
बर्डी ते कामठी व्हाया शांतीनगर ११६
बर्डी ते बेलतरोडी व्हाया रामेश्वरी, नरेंद्रनगर ८२
बर्डी ते वैशालीनगर ६४
बर्डी ते ओमनगर ४२
बर्डी ते न्यू मनीषनगर ४०
बर्डी ते चक्रपाणीनगर ३०
बर्डी ते मोमीनपुरा व्हाया कामठी २४
पिपळा फाटा ते गांधीबाग २३