४५ हजाराचे मंगळसूत्र पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:08+5:302021-02-26T04:11:08+5:30
काटाेल : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चाेरून नेले. ही घटना काटाेल शहरातील ठाेमा ले-आऊट ...
काटाेल : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चाेरून नेले. ही घटना काटाेल शहरातील ठाेमा ले-आऊट येथे बुधवारी (दि.२४) सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
धीरज रामदेव ढगे (५६, रा. ठाेमा ले-आऊट, काटाेल) हे मंगळवारी (दि.२३) आपल्या कुटुंबीयांसह मूळगावी सिर्सावाडी येथे गेले हाेते. दरम्यान, अज्ञात आराेपीने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील आलमारीचे लाॅकर ताेडून तेथील एका डबीमध्ये ठेवलेले १५ ग्रॅम साेन्याचे मंगळसूत्र (किंमत ४५,००० रुपये) घेऊन पाेबारा केला. बुधवारी ढगे घरी आल्यानंतर घरात चाेरी झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा पुढील तपास पाेलीस अंमलदार सुनील ठाेंबरे करीत आहेत.