दुसऱ्या दिवशी ४५० अतिक्रमणांचा सफाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:34+5:302021-01-20T04:09:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने बुधवारी शहरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. दुसऱ्या दिवशी शहराच्या विविध ...

450 encroachments cleared the next day | दुसऱ्या दिवशी ४५० अतिक्रमणांचा सफाया

दुसऱ्या दिवशी ४५० अतिक्रमणांचा सफाया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने बुधवारी शहरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. दुसऱ्या दिवशी शहराच्या विविध भागांतील फुटपाथवरील तब्बल ४५० अतिक्रमणांचा सफाया केला. आठ ते दहा ट्रक साहित्य जप्त केले. काही भागांतील विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटाव मोहीम धडाक्यात राबविण्यात आली.

लक्ष्मीनगर झोन : लक्ष्मीभवन चौक ते आठरस्ता चौक ते पोलीस प्रशिक्षण चौक ते साई मंदिर वर्धा रोड ते अजनी चौक, देवनगर ते छत्रपती चौक ते खामला चौक ते परत पोलीस प्रशिक्षण केंद्र या मार्गावरील १५८ अतिक्रमणे हटविण्यात आली. एक ट्रक साहित्य जप्त केले.

लक्ष्मीनगर : बजाजनगर ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल या परिसरातील फूटपाथवरील ३६ अतिक्रमण अतिक्रमण हटविले. पथकाने ट्रकभर साहित्य जप्त केले.

धरमपेठ झोन - गोकुळ पेठ बाजार परिसरात अतिक्रमण करून भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांनी उभारलेले टिनाचे शेड तोडण्यात आले. परिसरातील ठेले व दुकाने हटविण्यात आली. हजारी पहाड येथील एक झोपडी तोडण्यात आली. इंदिरा गांधी रुग्णालय ते अभ्यंकरनगर चौक मार्गालगतचे अतिक्रमण हटविण्यात आले. पथकाने ५२ अतिक्रमण हटविले.

हनुमाननगर झोेन : तुकडोजी पुतळा चौक ते क्रीडा चौक, रेशीमबाग परिसरातील सहा शेड तोडण्यात आले. पथकाने २२ अतिक्रमण हटविले.

धंंतोली झोन : बोरकर नगर, टिम्बर मार्केट परिसरात हायटेंशन लाइन खाली उभारण्यात आलेले दोन घरांचे बांधकाम तोडण्यात आले, तसेच घाट रोड, गणेश पेठ चौक ते आगाराम देवी चौक परिसरातील ४४ अतिक्रमण हटविले. झिरोमाईल परिसरातील पुस्तक विक्रेत्यांचे अतिक्रमण काढले. पथकाने एक ट्रक साहित्य जप्त केले.

नेहरूनगर झोन : हसनबाग चौक ते खरबी चौक, आउटर रिंग रोडवरील ३१ शेड काढले. दोन्ही बाजूंचे फूटपाथ मोकळे केले. दरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. कारवाईत ६४ अतिक्रमणे हटविण्यात आली. ७,५०० रुपयांचा दंड वसूल केला.

गांधीबाग झोन : भोईपुरा मच्छी मार्केट परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. तीन ठेले जप्त करून ५३ अतिक्रमण काढले.

सतरंजीपुरा झोन : दहबाजार पुलिया ते मारवाडी चौक ते जुना मोटार स्टँड चौक ते सुभाष पुतळा ते मच्छी मार्केट, जुना भंडारा रोड, आनंदनगर, बिनाकी मंगळवारी ते कांझी हाउस आदी भागांतील ४८ अतिक्रमण काढले.

लकडगंज झोन : छाप्रुनगर ते दानागंज चौक परिसरातील २२ अतिक्रम हटविले. त्यानंतर, डिप्टी सिग्नल ते शंकरनगर चौक परिसरातील ३८ अतिक्रमणाचा सफाया केला. मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले.

आशीनगर झोन : इंदोरा चौक ते कमाल चौक, आवळेबाबू चौक परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले. पथकाने ५२ अतिक्रमणे हटविली.

मंगळवारी झोन : जरीपटका जिंजर मॉल, नारा घाट, परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. या झोनमधील ३५ अतिक्रमणे हटविण्यात आली.

Web Title: 450 encroachments cleared the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.