चेन पुलिंग करून उतरविल्या बीअरच्या ४५३ बॉटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:21 PM2019-01-24T23:21:50+5:302019-01-24T23:23:28+5:30
आंध्र प्रदेशातून बल्लारशा, चंद्रपूरला दारूची तस्करी करणाऱ्या आरोपींना दारू उतरविताना आरपीएफचा कडेकोट बंदोबस्त दिसला. त्यामुळे आरोपींनी तेथे दारू न उतरविता बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान चेन पुलिंग करून बीअरच्या ५४ हजार ३६० रुपये किमतीच्या ४५३ बॉटल उतरविल्या. परंतु आरपीएफची चमू घटनास्थळी पोहोचल्यामुळे आरोपी उतरविलेली दारू घटनास्थळी सोडून फरार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंध्र प्रदेशातून बल्लारशा, चंद्रपूरला दारूची तस्करी करणाऱ्या आरोपींना दारू उतरविताना आरपीएफचा कडेकोट बंदोबस्त दिसला. त्यामुळे आरोपींनी तेथे दारू न उतरविता बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान चेन पुलिंग करून बीअरच्या ५४ हजार ३६० रुपये किमतीच्या ४५३ बॉटल उतरविल्या. परंतु आरपीएफची चमू घटनास्थळी पोहोचल्यामुळे आरोपी उतरविलेली दारू घटनास्थळी सोडून फरार झाले.
गुरुवारी रेल्वेगाडी क्रमांक ५७१३६ काजीपेठ-अजनी पॅसेंजरमध्ये सकाळी १०.४५ वाजता बोरखेडी-बुटीबोरीदरम्यान चेन पुलिंग करून गाडी थांबविण्यात आली. ते बीअरच्या बाटल्या असलेले पोते खाली उतरवीत असताना गाडीचा गार्ड बी. जे. राजपूत याने याची सूचना आरपीएफचे उपनिरीक्षक संजय सिंह, मनोज कुमार यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता १९ पोत्यात बीअरच्या बॉटल्स आढळल्या. परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. घटनेची माहिती अजनीचे निरीक्षक निर्मल टोपो यांना देण्यात आली. त्यानंतर उपनिरीक्षक आर. के. राम आणि जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुद्देमाल ताब्यात घेतला. दुसºया घटनेत दुपारी ३.३५ वाजता आरपीएफचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, आर. के. त्रिपाठी, विकास शर्मा, उषा तिग्गा, सुषमा ढोमणे नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर गस्त घालत असताना त्यांना एक पांढºया रंगाचे पोते बेवारस स्थितीत आढळले. आजूबाजूच्या प्रवाशांनी पोत्यावर आपला हक्क न सांगितल्यामुळे संशयाच्या आधारे पोत्याची तपासणी केली असता त्यात दारूच्या २,१६२ रुपये किमतीच्या ५१ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली. दोन्ही कारवाया आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.