४५३ पॉझिटिव्ह, ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:21 AM2020-12-04T04:21:04+5:302020-12-04T04:21:04+5:30

नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. बुधवारी ४५३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ...

453 positive, 11 killed | ४५३ पॉझिटिव्ह, ११ जणांचा मृत्यू

४५३ पॉझिटिव्ह, ११ जणांचा मृत्यू

Next

नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. बुधवारी ४५३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच २६४ रुग्ण बरे झाले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या घटल्याने रिकव्हरी रेट कमी होऊन ९२.१० टक्क्यावर आला आहे.

बुधवारी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरातील ३७६, ग्रामीणमधील ७५, जिल्ह्याबाहेरचे २ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील ६, ग्रामीणमधील ३ व जिल्ह्याबाहेरचे २ आहेत. आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या एकूण १,१२,७३३ वर पोहोचली आहे तर मृतांची संख्या ३,६९२ इतकी झाली. तसेच १,०३,८३० रुग्ण बरे झाले आहेत. आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील २३० तर ग्रामीणमधील ३४ जण आहेत.

बुधवारी ५,५१३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ४,५८४ आणि ग्रामीणचे ९२९ आहेत. खासगी प्रयोगशाळेत १७६ नमुने पॉझिटिव्ह आले. तर ॲन्टिजेन टेस्टमध्ये ३५, एम्सच्या प्रयोगशाळेत २३, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ५१, मेयोच्या प्रयोगशाळेत ६५, माफसूमध्ये २२, नीरीमध्ये ४३ आणि नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ३८ नमुने पॉझिटिव्ह आले.

ॲक्टिव्ह ५,२११

बरे झालेले १,०३,८३०

मृत ३,६९२

Web Title: 453 positive, 11 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.