४५८ कोटींसाठी सरकारकडे साकडे
By Admin | Published: August 18, 2015 03:31 AM2015-08-18T03:31:25+5:302015-08-18T03:31:25+5:30
शहरातून नाग, पिवळी व पोहरा अशा तीन प्रमुख नद्या वाहतात. तसेच लहान नाल्यांची संख्या मोठी आहे. अतिवृष्टी व
नागपूर : शहरातून नाग, पिवळी व पोहरा अशा तीन प्रमुख नद्या वाहतात. तसेच लहान नाल्यांची संख्या मोठी आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नदी व नाल्याकाठावरील वस्त्या जलमय होतात. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याने नद्या व नाल्यांची दुरुस्ती तसेच संरक्षण भिंती उभारण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे ४५८ कोटीची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी दिली.
१३ आॅगस्टला २०१३ सालची पुनरावृत्ती झाली. २४ तासात तब्बल १६४ मि.मी. पाऊ स झाल्याने शहरातील तलाव ओव्हर फ्लो झाले. नद्या व नाल्यांना पूर आल्याने नदीकाठावरील व सखल भागातील वस्त्या जलमय झाल्या होत्या. पुरात वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीत लोकांना मदत करण्यासाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली होती. अग्निशमन विभागाच्या बचाव पथकांच्या माध्यमातून समतानगर येथील ३५ व भरतवाडा येथील ४० लोकांना बाहेर काढण्यात आले. हुडकेश्वर येथील पोहरा नदीला पूर आल्याने नदीकाठावरील ४२ लोक ांना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. ५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होेते. विस्थापितांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
पालकमंत्र्यांनी शहरातील नुकसानीचा अहवाल मागितला होता. त्यानुसार मनपा प्रशासनाने केलेल्या सर्वेच्या प्राथमिक अंदाजानुसार नुकसान दर्शविण्यात आले आहे. आपत्ती ग्रस्तांना र्आिर्थक मदतीची गरज आहे. ती शासनाकडून लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)
पुरामुळे ६० कोटींचे नुकसान
४१३ आॅगस्टला नागपूर शहरात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे ४१६ कुटुंब विस्थापीत झाली. ४८६ लोकांना पुरातून वाचविण्यात आले. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. मालमत्ताचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार ५९.६२ कोटीचे नुकसान झाले आहे. या बाबतचा अहवाल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आल्याची माहिती दटके यांनी सोमवारी दिली.
नुकसानग्रस्त वस्त्या
४शहरातील समतानगर, कस्तुरबानगर, रिमानगर, गोदवारीनगर, झिंगाबाई टाकळी, भदन्त कौशल्यनगर, वेलेनगर, पाडुरंगनगर, काचीपुरा, सोनियानगर, वनदेवीनगर, संघर्षनगर, पांढराबोडी,भरतवाडा, हुडकेश्वर(पिपळा फाटा) गोरेवाडा, मानकापूर, गुलशननगर, विटभट्टी, अंबाझरी कॉलनी आदी वस्त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.