४,५९१ चाचण्या, २,८०२ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:43+5:302021-05-01T04:07:43+5:30

सावनेर/कळमेश्वर/नरखेड/काटोल//कामठी/उमरेड/मौदा/कुही/रामटेक/हिंगणा : नागपूर शहरात कोरोनाबाधितांच्या बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, गुरुवारी मध्यरात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ...

4,591 tests, 2,802 infected | ४,५९१ चाचण्या, २,८०२ बाधित

४,५९१ चाचण्या, २,८०२ बाधित

googlenewsNext

सावनेर/कळमेश्वर/नरखेड/काटोल//कामठी/उमरेड/मौदा/कुही/रामटेक/हिंगणा : नागपूर शहरात कोरोनाबाधितांच्या बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, गुरुवारी मध्यरात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४५९१ चाचण्यांपैकी २८०२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच ग्रामीण भागात ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आता ही संख्या १८५३ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत १,१२,२४८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी शुक्रवारी २४४७ रुग्ण बरे झाले. ग्रामीण भागात आतापर्यंत ७९,०७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३१,७९३ इतकी आहे.

सावनेर तालुक्यात १७१ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ३१, तर ग्रामीण भागातील १४० रुग्णांचा समावेश आहे. यासोबतच तालुक्यात चिचोली आरोग्य केंद्राअंतर्गत तीन, तर पाटणसावंगी आरोग्य केंद्रांतर्गत एका रुग्णाचा मृत्यू झाला.

कुही तालुक्यात विविध केंद्रांवर २७९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ५४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात कुही येथील ५, मांढळ (३), वेलतुर (२१), साळवा (८) तर तितुर येथील १७ रुग्णांचा समावेश आहे. उमरेड तालुक्यात ८५ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४५ तर ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे. काटोल तालुक्यात ५१७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील २९ रुग्ण, तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागात कोंढाळी केंद्रांतर्गत ९, कचारी सावंगा केंद्रांतर्गत १९, तर येनवा केंद्रांतर्गत २१ रुग्णांची नोंद झाली.

नरखेड तालुक्यात १६९ रुग्णांची भर पडली. यात शहरातील १९ तर ग्रामीण भागातील १५० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २,५९२ तर शहरात ५८२ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (४५), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (३४), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (५९), तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांत १२ रुग्णांची नोंद झाली.

रामटेक तालुक्यात १३७ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील २७, तर ग्रामीणमधील १३७ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ५८३६ झाली आहे. यातील ४०५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६४७ इतकी आहे.

हिंगणा तालुक्यात १०३३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरीत येथील ३०, डिगडोह (१३), गुमगाव (१०), हिंगणा (७), टाकळघाट व गिदमगड प्रत्येकी ६, किन्ही धानोली (५), मोहगाव (४), गिरोला, सुकळी गुपचूप, रायपूर व डिगडोह पांडे प्रत्येकी २ तर सुकळी बेलदार, भारकस , शिरुळ, वटेघाट, गोंडवाना, खैरी मोरेश्वर, देवळी काळबांडे, अडेगाव , आमगाव, कान्होलीबारा, मोंढा शिवमडका, इसासनी, गौराळा व कवडस येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १०,४०३ इतकी झाले आहे. यातील ८,००६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर २१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कळमेश्वर तालुक्यात बाधितांचा ग्राफ वाढतोय

कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात पुन्हा १८४ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिका क्षेत्रातील ५०, तर ग्रामीण भागात १३४ रुग्णांचा समावेश आहे.

---

उमरेड कोविड सेंटरलाही मदत

उमरेड येथील कोविड सेंटरला राजेंद्र मुळक लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने मिनी व्हेंटिलेटर तसेच अन्य उपयोगी साहित्य शुक्रवारी देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे, रमेश किलनाके, शिवदास कुकडकर, सुरज इटनकर, विशाल देशमुख, सुरेश चिमलकर, मनीष शिंगणे, अमित लाडेकर, प्रकाश मोहोड, शुभम गिरडकर, अक्षय वाघमारे, दीपक जनवार, चंदू वाघमारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Web Title: 4,591 tests, 2,802 infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.