नागपुरात निवडणूक विशेष रेल्वेगाडीत सापडली ४६४ काडतुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:35 PM2018-11-21T23:35:50+5:302018-11-21T23:38:10+5:30

निवडणूक विशेष रेल्वे गाडीत बेवारस स्थितीत ४६४ काडतुसे  सापडली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच नागपूर रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही काडतुसे रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली.

464 cartridges found in election special train in Nagpur | नागपुरात निवडणूक विशेष रेल्वेगाडीत सापडली ४६४ काडतुसे

नागपुरात निवडणूक विशेष रेल्वेगाडीत सापडली ४६४ काडतुसे

Next
ठळक मुद्देरेल्वे कर्मचाऱ्यांचे गेले लक्ष : आरपीएफने केले रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन      

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक विशेष रेल्वे गाडीत बेवारस स्थितीत ४६४ काडतुसे  सापडली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच नागपूर रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही काडतुसे रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली.
रेल्वे स्टेशनवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानसह तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. याअंतर्गत निवडणूक विशेष रेल्वे गाडी चालविली जात आहे. तेलंगणा येथे निवडणूक कामासाठी भारत तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी)चे शस्त्रांसह सज्ज असलेल्या जवानांना घेऊन निवडणूक विशेष रेल्वे (इलेक्शन स्पेशन ट्रेन) लखनौवरून विजयवाडा येथे जात होती. ही रेल्वे गाडी विजयवाडा येथे जवानांना व त्यांच्या शस्त्रांना उतरविल्यानंतर परत जाताना मंगळवारी ती नागपुरात पोहोचली. ती गुरुवारी छत्तीसगडच्या रायपूर येथे रवाना होणार होती. यासाठी बुधवारी या रेल्वे गाडीची साफसफाई नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ७ जवळील कॅरेज अ‍ॅण्ड वॅगन डिपार्टमेंट(सीअ‍ॅण्डडब्ल्यू)च्या वॉशिंग सायडिंगमध्ये केली जात होती. यादरम्यान कर्मचाऱ्यांना एका कोचमध्ये ७ नंबरच्या सीटखाली एक हिरव्या रंगाचा बॉक्स आढळून आला. त्याला जवळून पाहिले असता त्यात इन्सास रायफलचे काडतूस होते. लगेच ही माहिती आरपीएफला देण्यात आली. आरपीएफने बॉक्सची तपासणी केली असता त्यात ४६४ काडतुसे  सापडली. यानंतर हा बॉक्स रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.

Web Title: 464 cartridges found in election special train in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.