नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ४८ बॉटल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 09:32 PM2018-04-18T21:32:25+5:302018-04-18T21:32:42+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी २ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दारूच्या ४८ बॉटल्सची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ अटक करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी २ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दारूच्या ४८ बॉटल्सची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ अटक करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक विद्याधर यादव, महिला आरक्षक उषा तिग्गा, सुषमा ढोमणे, अर्जुन सामंतराय हे बुधवारी दुपारी २ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. त्यांना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळली. तिची चौकशी केली असता त्या व्यक्तीने आपले नाव जयकिशन गौरीशंकर भार्गव (२७) रा. हंसापुरी, भंडारा रोड नागपूर सांगितले. त्याच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ७,४४० रुपये किमतीच्या ४८ बॉटल आढळल्या. आरोपीला मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.