महावितरणतर्फे ४८ गुणवंत कामगारांचा गौरव

By admin | Published: May 2, 2017 01:48 AM2017-05-02T01:48:54+5:302017-05-02T01:48:54+5:30

वर्षभर ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता वीज ग्राहकांना २४ तास अखंडित वीज मिळावी याकरिता....

48 talent workers honor by Mahavitaran | महावितरणतर्फे ४८ गुणवंत कामगारांचा गौरव

महावितरणतर्फे ४८ गुणवंत कामगारांचा गौरव

Next

कामगार दिन : कार्यक्रमाला सहा वर्षांची परंपरा
नागपूर : वर्षभर ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता वीज ग्राहकांना २४ तास अखंडित वीज मिळावी याकरिता अविरतपणे प्रयत्नशील असलेल्या ४८ वीज कामगारांचा महावितरणतर्फे सोमवारी कामगार दिनाचे औचित्य साधून गौरव करण्यात आला.
महावितरणच्या विद्युत भवन मुख्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महावितरणचे प्रादेशिक कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांच्यासह नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफीक शेख व मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) किशोर मेश्राम उपस्थित होते.
दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते महावितरणमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या यंत्रचालक व जनमित्र या तांत्रिक कामगारांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, हा उपक्रम मागील सहा वर्षांपासून सातत्याने राबविल्या जात आहे.
त्यानुसार यावर्षी वर्धा एमआयडीसी येथे काम करीत असताना सुरक्षा साधनांचा योग्य वापर करीत आपल्या पाच सहकारी कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविल्याबद्दल वर्धा येथील प्रधान तंत्रज्ञ ए.बी. कडू यांचा प्रसाद रेशमे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नागपूर ग्रामीण मंडलातील श्रीकांत फटिंग (उमरेड), अजय मोरे ( उमिया), अनंत कांबळे (गोंडखैरी), माधव घंगारे (येनवा), मनिराम डहारे (मांढळ), ईश्वर वाकडे (बेसूर), मारोती डुकरे (उमरेड), आनंदराव जपूलकर (हुडकेश्वर), सीरसेन मानकर (कन्हान), चंद्रभान खेरे (मनसर), महेश ठाकूर (मोदी लेन, कामठी), नितीन सावरकर (मौदा), गणपत कर्णेवार (खापरखेडा), अशोक झोडे (गोंडखैरी), सुधाकर जुनघरे (सावनेर), तपस्वी लांबट (पारशिवनी), कुंचिलाल नवधिंगे (खापा), रामकृष्णन ठंगमुथ्थू (खापा), मनोज बावणे (लोहारी सावंगा), सुरेश इटनकर (सावरगाव), नामदेव व्यवहारे (कोंढाळी), प्रमोद ठाकरे (काटोल), श्रीकांत देशमुख (कोहळी) नागपूर शहर मंडलातील प्रकाश जामोडकर (बुटीबोरी), जितेंद्र चौधरी (काँग्रेसनगर), सतीश दिघे (खापरी), सचिन कथलकर (मोहगाव), भास्कर चांदेकर (हिंगणा एमआयडीसी), साहेबराव गीते (हिंगणा), प्रेमलाल गुप्ता (रिजंट), रमेश मानकर (गोकुळपेठ) व अमोल रहाटे (त्रिमूर्तीनगर) यांचा समावेश होता. या सोबतच वर्धा मंडलातील रोशन देशमुख (कारंजा), हेमंत खोटे (भिडी), दिलीप मेशरे (कानगाव), शैलेश चरडे (आर्वी), अरविंद कदम (आष्टी), अरुण घाटे (रोहना), विजयकुमार सोंडवले (पिंपळखुटा), अशोक पाटणकर (कारंजा), नितीन सांगोळे (वर्धा), देवीदास उईके (सेलू), प्रशांत हिरपूरकर (वर्धा), राकेश ठाकरे (आंजी), महादेव सातपुते (देवळी), बंडू वाकडे (हिंगणघाट), संजय गायकवाड (कानगाव) व शामराव मून (गिरड) या तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते उमेश शहारे, बंडू वासनिक, सम्राट वाघमारे, राजेंद्र पवार, मनीष वाठ, राकेश जनबंधू, स्वप्निल गोतमारे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अनिल बऱ्हाटे, कार्यकारी अभियंते सुहास मेत्रे, कुंदन भिसे, सोमन्ना कोळी, प्रफुल्ल लांडे, नीरज वैरागडे व संजय विटणकर यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक मधुसूदन मराठे यांनी केले, तर सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: 48 talent workers honor by Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.