४.८० कोटींंची सडकी सुपारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:25 AM2017-11-17T01:25:04+5:302017-11-17T01:25:15+5:30

सडक्या आणि असुरक्षित सुपारी विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धाडी टाकून आतापर्यंत ४ कोटी ८० लाख रुपये किमतीची सुपारी जप्त केली आहे.

4.80 crore worth of cash supermarket seized | ४.८० कोटींंची सडकी सुपारी जप्त

४.८० कोटींंची सडकी सुपारी जप्त

Next
ठळक मुद्देएफडीएची कारवाई : आठ महिन्यांची आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सडक्या आणि असुरक्षित सुपारी विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धाडी टाकून आतापर्यंत ४ कोटी ८० लाख रुपये किमतीची सुपारी जप्त केली आहे. जप्तीची आकडेवारी १ एप्रिल ते १४ नोव्हेंबर २०१७ या कालावधीची आहे.
विभागाने नोव्हेंबर महिन्यात तीन व्यापाºयांवर धाडी टाकून एकूण जवळपास १८ लाख रुपयांची सडकी सुपारी जप्त केली. १४ नोव्हेंबरला कळमना पोलीस ठाणे आणि अन्न व औषधी प्रशासन नागपूर कार्यालयाच्या संयुक्त मोहिमेंतर्गत धीरजकुमार त्रिवेणी चौधरी यांच्या मालकीच्या चिखली ले-आऊट, कळमना येथील कृष लघु गृहउद्योगावर धाड टाकून २१६० किलो सुपारी जप्त केली. साठ्यातून तीन नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले आणि उर्वरित ३.३४ लाख रुपये किमतीच्या २१५४ किलो सुपारीचा साठा जप्त केला. अन्य कारवाई राजेशकुमार ग्यानचंद थारवानी यांच्या चिखली ले-आऊट, कळमना येथील आर.जी. ट्रेडर्सवर करण्यात आली. येथून ३.१ लाख रुपये किमतीची १३४६ किलो सुपारी जप्त केली. दोन्ही कारवाईत ६.३५ लाख रुपये किमतीचा साठा अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसार कमी दर्जा व असुरक्षित असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला.
ही कारवाई नागपूर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे व अन्न सुरक्षा अधिकारी भास्कर नंदनवार, प्रफुल्ल टोपले, प्रवीण उमप, अनंत चौधरी आणि कळमना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बैस यांनी संयुक्तरीत्या केली. जनआरोग्याचा विचार करता याप्रकारची धडक मोहीम सतत सुरू राहील, असे शशिकांत केकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: 4.80 crore worth of cash supermarket seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.