नागपुरातून पहिल्या दिवशी सुटल्या ४९ बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 11:56 PM2020-08-20T23:56:25+5:302020-08-20T23:57:34+5:30
कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाले होते. पाच महिन्यानंतर एसटीने आंतरजिल्हा वाहतूक सुरू केली. नागपूर विभागात पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर विभागातून विविध शहरांसाठी २२ तर ग्रामीण भागात २७ बसेस सोडण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाले होते. पाच महिन्यानंतर एसटीने आंतरजिल्हा वाहतूक सुरू केली. नागपूर विभागात पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर विभागातून विविध शहरांसाठी २२ तर ग्रामीण भागात २७ बसेस सोडण्यात आल्या.
कोरोनामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. २० आॅगस्टपासून एसटीने आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व बसेस स्वच्छ करून प्लॅटफॉर्मवर लावल्या. एका बसमध्ये २३ प्रवाशांची क्षमता होती. परंतु बहुतांश प्रवाशांना माहिती नसल्यामुळे एका बसमध्ये केवळ १२ प्रवासी चढू शकले.
आम्ही प्रवाशांची काळजी घेत आहोत. बसेसचे निर्जंतुकीकरण करून प्रवाशांच्या सेवेसाठी पाठविण्यात येत आहेत. उद्या अजून प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
नागपूर विभागातून सोडलेल्या बसेस
अमरावती ५
यवतमाळ ५
चंद्रपूर ४
भंडारा ३
गोंदिया ३
गडचिरोली २
नागपूर ग्रामीण
रामटेक ४
काटोल ६
सावनेर ७
उमरेड ४
पारशिवनी २
मोहपा १
कोंढाळी ३