कुही तालुक्यात २१५ जागांसाठी ४९२ उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:10 AM2020-12-31T04:10:42+5:302020-12-31T04:10:42+5:30
कुही : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या २१५ जागांसाठी एकूण ४९२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी (दि. ३०) उमेदवारी ...
कुही : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या २१५ जागांसाठी एकूण ४९२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
बुधवारी (दि. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी केली हाेती. अखेरच्या दिवशी ३०९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.
प्रत्येक उमेदवाराचा उमेदवारी अर्ज १६ पानांचा असल्याने ते सादर करण्यास विलंब होत होता. त्यामुळे अर्ज सादर करण्यासाठी रात्री ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली हाेती. कऱ्हांडला येथे पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, हरदोली (राजा) येथे १०, चितापूर येथे सहा, डोडमा येथे १२, ससेगाव येथे सात, वडेगाव (काळे) येथे १२, वीरखंडी येथे पाच, वेळगाव येथे एक, परसोडी (राजा) येथे सात, बानोर येथे चार, मुसळगाव येथे सहा, खोकर्ला येथे एक, किन्ही येथे दाेन, कुजबा येथे ११, बोरी (नाईक) येथे सात, म्हसली येथे दाेन, हरदोली (नाईक) येथे १०, देवळी (कला) येथे १०, भटरा येथे ११, राजोला येथे नऊ, चापेगडी येथे २५ व साळवा येथे १९ अशा एकूण १८३ उमेदवारांनी बुधवारी त्यांचे उमेदवारी अर्ज सादर केले.
.....
१५ जानेवारीला मतदान
प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची गुरुवारी (दि. ३१) छाननी केली जाणार आहे. ४ जानेवारीला नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. त्याच दिवशी चिन्ह वाटप केले जाईल. उमेदवारांना प्रचार करण्यासाठी जवळपास नऊ दिवस मिळणार असून, १५ जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे.