पाच वर्षांत देशात २५ कोटींचा गहू-तांदूळ खराब; माहिती अधिकारातून झालं उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:00 AM2020-03-09T03:00:59+5:302020-03-09T06:32:43+5:30

२०१५-१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत ०.२१६ एलएमटी (लाख मेट्रिक टन) गहू-तांदूळ खराब झाले. यात ०.०९८ एलएमटी गहू व ०.११८ एलएमटी तांदळाचा समावेश होता.

5 crore wheat-rice bad in country in five years; Information has come out of the right | पाच वर्षांत देशात २५ कोटींचा गहू-तांदूळ खराब; माहिती अधिकारातून झालं उघड

पाच वर्षांत देशात २५ कोटींचा गहू-तांदूळ खराब; माहिती अधिकारातून झालं उघड

googlenewsNext

नागपूर : ‘एफसीआय’च्या (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) गोदामात जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असून २०१५-१६ पासून ५८ महिन्यांत २५ कोटींहून अधिक किमतीचे गहू-तांदूळ खराब झाले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘एफसीआय’कडे विचारणा केली. ‘एफसीआय’कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २०१५-१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत ०.२१६ एलएमटी (लाख मेट्रिक टन) गहू-तांदूळ खराब झाले. यात ०.०९८ एलएमटी गहू व ०.११८ एलएमटी तांदळाचा समावेश होता. खराब झालेल्या गहू-तांदळाची किंमत ही २५ कोटी १२ लाख इतकी होती. यात ९ कोटी २४ लाख रुपयांचे गहू व १५ कोटी ८८ लाखांच्या तांदळाचा समावेश होता. २०१६-१७ मध्ये सर्वाधिक ०.०९ एलएमटी गहू तांदूळ खराब झाले. त्याची किंमत ९ कोटी १२ लाख इतकी होती. २०१८-१९ मध्ये ६ कोटी ७३ लाख तर २०१९-२० मधील पहिल्या १० महिन्यातच २ कोटी ६१ लाखांचे गहू-तांदूळ खराब झाले.


‘उंदरांमुळे काहीच नुकसान नाही’
‘एफसीआय’मध्ये उंदरांमुळे काहीच नुकसान झाले नसल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. ‘एफसीआय’कडून वैज्ञानिकरीत्या
धान्य साठविण्यात येते. नियमितपणे ‘पेस्ट कंट्रोल’देखील होते, असे सांगण्यात आले.

Web Title: 5 crore wheat-rice bad in country in five years; Information has come out of the right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.