दालियावरील ५ टक्के जीएसटी हटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:29 AM2019-09-22T00:29:06+5:302019-09-22T00:32:07+5:30
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी दालियावरील ५ टक्के जीएसटी हटविल्याने गरीब व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी काही वस्तूंवरील जीएसटी कमी करून तर काहींवरील रद्द करून व्यापाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. दालियावरील ५ टक्के जीएसटी हटविल्याने गरीब व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
दि होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, जीएसटीमध्ये धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा समावेश नाही. पण आवश्यक वस्तू दालियावर ५ टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा फटका गरीब आणि सामान्यांना बसला होता. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मल सीतारमन यांना पत्र पाठवून दालियावरील जीएसटी हटविण्याची मागणी केली होती. अखेर मागणी मान्य करून वित्तमंत्र्यांनी दालियावरील जीएसटी हटवून एचएसएन ०७१३ मध्ये समावेश केला आहे. त्यांच्या निर्णयाचा गरिबांना फायदा होणार आहे.