खासगी शाळांच्या शुल्कात ५० टक्क्यांची सूट द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 09:33 PM2020-06-03T21:33:03+5:302020-06-03T21:34:34+5:30
सीबीएसई तसेच खासगी शाळांतील लॉकडाऊनच्या कालावधीतील शुल्क माफ करण्यात यावे. तसेच पुढील शैक्षणिक सत्रातील शुल्कात ५० टक्क्याची सूट देण्यात यावी, अशी मागणी आ.विकास ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे शाळा-महाविदयालये बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या कालावधीत बहुतांश उद्योगधंदे व कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेकांची आर्थिक मिळकत बंद झाली असून दैनंदिन गरजा भागविणेदेखील कठीण झाले आहे. अशा स्थितीत मुलांच्या शाळेचे शुल्क भरणे हे आव्हानच आहे. त्यामुळे सीबीएसई तसेच खासगी शाळांतील लॉकडाऊनच्या कालावधीतील शुल्क माफ करण्यात यावे. तसेच पुढील शैक्षणिक सत्रातील शुल्कात ५० टक्क्याची सूट देण्यात यावी, अशी मागणी आ.विकास ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.
लॉकडाऊन लागल्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद झाले आहेत. वार्षिक परीक्षादेखील झाल्या नाहीत. अशा स्थितीत अनेक सीबीएसई व खासगी शाळांनी शुल्क मागण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पालकांसमोरील चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांतील शुल्क माफ करण्यात यावे. ज्यांनी अगोदरच शुल्क भरले असेल ते पुढील शुल्कात समायोजित करण्यात यावे. तसेच पुढील शैक्षणिक सत्रातील शुल्क ५० टक्के माफ करण्यात यावे आणि पुस्तके-गणवेश बदलण्यात येऊ नये. जे विद्यार्थी वरच्या वर्गात गेले आहेत त्यांची पुस्तके जुन्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.