एकाच दिवशी ५० शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:21 AM2017-11-10T01:21:03+5:302017-11-10T01:21:16+5:30

शासकीय रुग्णालयातील सोयी व दुर्लक्षितपणाची नेहमीच चर्चा होते. परंतु आता हे चित्र बदलत आहे. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात सध्याच्या घडीला १०५ रुग्ण भरती असून,...

50 surgeries on one day | एकाच दिवशी ५० शस्त्रक्रिया

एकाच दिवशी ५० शस्त्रक्रिया

Next
ठळक मुद्देमेडिकलचा नेत्ररोग विभाग : विश्वास व सोयींमुळे रुग्णांची वाढतेय गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय रुग्णालयातील सोयी व दुर्लक्षितपणाची नेहमीच चर्चा होते. परंतु आता हे चित्र बदलत आहे. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात सध्याच्या घडीला १०५ रुग्ण भरती असून, आज शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ५० रुग्णांवर विविध प्रकारातील नेत्र शस्त्रक्रिया होणार आहेत. शासकीय रुग्णालयाच्या इतिहासात विना शिबिर हे पहिल्यांदाच होत असल्याचे बोलले जात आहे. रुग्णालयावर रुग्णांचा वाढता विश्वास व सोयींमुळे हे शक्य झाले आहे.
सर्वसामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयांखेरीज दुसरा पर्याय नसतो. पण त्यांच्या हातात पैसा नाही म्हणून त्यांना कमी दर्जाच्या सेवाच मिळणार, हे दुष्टचक्र नागपूर मेडिकलने तोडल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. मेडिकलला अत्याधुनिक आणि आरोग्य यंत्रणेला रुग्णाभिमुख करण्याचे आव्हान अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी स्वीकारले आहे. रुग्णांची सोय केंद्रस्थानी ठेवून डॉ. निसवाडे यांच्या मार्गदर्शनात नेत्ररोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी नेत्र शल्यचिकित्सा विभागाचा कायापालट केला आहे; सोबतच आपला विभाग आणि यंत्रणा कार्यक्षम आणि रुग्णाभिमुख बनविण्यावर त्यांनी भर दिला आहे. मोतीबिंदूसोबत काचबिंदू, डोळ्यांचा तिरळेपणा, कृत्रिम नेत्ररोपण, पापणी खाली पडणे, नासूर येणे व डोळ्याच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियेला सुरुवात झाली असून आतापर्यंत कित्येक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. या विभागावर रुग्णांचा विश्वास वाढत चालल्याने रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. या विभागांतर्गत येणाºया महिलांचा वॉर्ड क्रमांक १४ मध्ये ३० खाटा मंजूर असताना, सध्याच्या घडीला ५६ रुग्ण तर पुरुषांच्या वॉर्ड क्रमांक १३ मध्ये ४९ रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी यातील ५० रुग्णांवर मोतीबिंदूपासून ते बुबुळ प्रत्यारोपण, अशा विविध शस्त्रक्रिया होणार आहेत. शासकीय रुग्णालयात एकाच विभागात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत शस्त्रक्रिया पहिल्यांदाच होत आहे.
वर्षाला दोन हजारावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया
मेडिकलच्या नेत्ररोग विभागात वर्षाला सरासरी दोन हजारावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत आहेत. विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४ मध्य े१८४० शस्त्रक्रिया , २०१५च्या १९५७ शस्त्रक्रिया, २०१६ मध्ये २३०३ शस्त्रक्रिया तर आॅगस्ट २०१७ पर्यंत १६०१ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
नेत्र शस्त्रक्रियेचा वाढता आकडा
नेत्ररोग विभागात मोतीबिंदू, काचबिंदू, किरकोळ व गंभीर मिळून २०१४ मध्ये २९९७ नेत्र शस्त्रक्रिया झाल्यात. २०१५ मध्ये ही संख्या वाढून ती ३००३ पोहचली. २०१६ मध्ये यात ३०० ने वाढ होत ही संख्या ३२९३ शस्त्रक्रियेवर पोहचली तर आॅगस्ट २०१७पर्यंत २७५० शस्त्रक्रिया झाल्या. शस्त्रक्रियेचा हा आकडा वाढतच चालला आहे.

Web Title: 50 surgeries on one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.