नागपुरात ५० ते ७६ हजार कुटुंबं धान्यापासून वंचित; जिल्ह्याच्या तुलनेत शहरात बिकट स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 08:00 AM2023-06-17T08:00:00+5:302023-06-17T08:00:07+5:30
Nagpur News शासन सर्वांना धान्य पुरवठा करीत असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात दर महिन्याला हजारो गरीब कुटुंबं धान्यापासून वंचित राहत असल्याची माहिती आहे. ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.
रियाज अहमद
नागपूर : शासन सर्वांना धान्य पुरवठा करीत असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात दर महिन्याला हजारो गरीब कुटुंबं धान्यापासून वंचित राहत असल्याची माहिती आहे. ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.
नागपूर शहर आणि ग्रामीणसह संपूर्ण जिल्ह्यात आठ लाखांहून अधिक कार्ड धारक शासकीय धान्यावर अवलंबून आहेत; परंतु यातूनही ५० ते ७६ हजार कार्डधारक म्हणजे कुटुंब धान्यापासून वंचित राहत आहेत. ‘लोकमत’ला माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत १ एप्रिल २०२२ ते ३० मे २०२३ पर्यंतच्या आकडेवारीचा खुलासा झाला आहे. या माहितीत हे स्पष्ट झाले आहे की, ग्रामीणच्या तुलनेत शहरी भागात धान्यापासून वंचित राहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
आकडेवारीनुसार शहरी भागात डिसेंबर महिन्यात १३९६२ वगळल्यास प्रत्येक महिन्यात धान्यापासून वंचित झालेल्या कार्ड धारकांची संख्या कमीतकमी २८ हजार १३३ आणि अधिकाधिक ४३ हजार ९७८ आहे. तर ग्रामीण भागात नोव्हेंबरमध्ये ५१५० आणि मार्च २०२३ मध्ये १५७३९ वगळल्यास इतर महिन्यात धान्यापासून वंचित राहिलेल्या कुटुंबांची संख्या कमीतकमी २२ हजार १६४ आणि अधिकाधिक ३२ हजार ५१० असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
.............