५० वर्षात बँकांची संख्या तिप्पट, तर ठेवी वाढल्या २६३१ पट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 05:05 AM2019-07-20T05:05:10+5:302019-07-20T05:05:17+5:30

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९ जून १९६९ रोजी जाहीर केले, त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली.

In 50 years, the number of banks was tripled, and the deposits increased 2631 times | ५० वर्षात बँकांची संख्या तिप्पट, तर ठेवी वाढल्या २६३१ पट

५० वर्षात बँकांची संख्या तिप्पट, तर ठेवी वाढल्या २६३१ पट

Next

नागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९ जून १९६९ रोजी जाहीर केले, त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली. या ५० वर्षात देशातील व्यापारी बँकांची संख्या जवळपास तीनपट वाढून ८९ वरून २२२ झाली तर ठेवी मात्र २६३१ पटीने वाढून ४६४६ कोटींवरून तब्बल १२२.२६ लाख कोटींवर पोहोचल्या, अशी माहिती औरंगाबादच्या बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अ‍ॅन्ड रिसर्च अ‍ॅकेडमीने (बेट्रा) संकलित केलेल्या आकडेवारीतून उघड होते.
बँकांमधील ठेवी या जनतेच्या आर्थिक प्रगतीच्या मानक असतात या निकषावर जनतेची आर्थिक परिस्थिती सुदृढ झाल्याचा निष्कर्ष निघतो.
याच कालावधीत व्यापारी बँकांचे एकूण कर्ज २१४७ पटीने वाढून ३५९९ कोटीवरून ७७.३० लाख कोटींवर गेले आहे. बँकांचे कर्जवाटप हे उद्योग/व्यापार क्षेत्रांची प्रगती दाखवते. यावरून देशातील उद्योग/व्यापार क्षेत्राने किती प्रगती केली त्याचा अंदाज येतो.
या कर्जामध्ये प्राधान्य क्षेत्र म्हणजे कृषी, गृहउद्योग, लघु व मध्यम उद्योग युवा/महिला उद्योजकांचे व्यवसाय हे येतात. प्राधान्य क्षेत्राकडील कर्ज ५०४ कोटीवरून तब्बल २५.५५ लाख कोटीवर गेले आहे. प्राधान्य क्षेत्र कर्जाची ही वाढ ५०६५ पट आहे.
बँकांच्या ठेवी आणि कर्जवाटप यांचे प्रमाण बँका आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहेत ते दर्शवते. साधारणत: ठेवींच्या किमान ६५
टक्के कर्जवाटप मानले जाते.
भारतीय बँकांचे ठेवी-कर्ज प्रमाण ५० वर्षापूर्वी ७७.५० टक्के होते ते वाढून २०१९ साली ७८.२० टक्के झाले आहे ही चिंतेची बाब आहे.
>५० वर्षातील व्यापारी बँकांची प्रगती
क्र. जून १९६९ मार्च २०१९
१ व्यापारी बँकांची संख्या ८९ २२२
२ शाखांची संख्या ८२६२ १.४१ लाख
३ ठेवी रु.४६४६ कोटी रु. १२२.२६ लाख कोटी
४ कर्जवाटप रु. ३५९९ कोटी रु. ७७.३० लाख कोटी
५ प्राधान्य क्षेत्र कर्ज ५०४ कोटी २५.५३ लाख कोटी
६ ठेवींशी कर्जाचे प्रमाण ७७.५०% ७८.२०%

Web Title: In 50 years, the number of banks was tripled, and the deposits increased 2631 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.