५० तरुणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:08 AM2021-01-02T04:08:55+5:302021-01-02T04:08:55+5:30

पचखेडी : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नेहरू युवा केंद्र आणि न्यू सार्वजनिक बालगणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने पचखेडी (ता. ...

50 youths donated blood | ५० तरुणांनी केले रक्तदान

५० तरुणांनी केले रक्तदान

Next

पचखेडी : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नेहरू युवा केंद्र आणि न्यू सार्वजनिक बालगणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने पचखेडी (ता. कुही) येथे गुरुवारी (दि. ३१) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात स्थानिक ५० तरुणांनी रक्तदान केले.

रक्तदानाचे महत्त्व, काेराेना संक्रमण काळात रक्ताची गरज व सामाजिक बांधिलकी जाेपासत या शिबिराचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती आयाेजकांनी उद्घाटनप्रसंगी दिली. यावेळी माजी सरपंच दिलीप भोयर, गुणवंता लांजेवार, हरीश शेंडे, शैलेश ढोरे, गोलू शेंडे, गजानन सोनवाणे, लोकेश खराबे, बंटी कामळे, राकेश राघोर्ते, आशिष भोयर, मंगेश भोयर, विशाल राघोर्ते, निकेश मुळे, अभिमन खराबे उपस्थित होते. नागपूर येथील जीवन ज्योती ब्लड बँकेच्या चमूने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.

Web Title: 50 youths donated blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.