नागपुरात ५०० रुपयांच्या खंडणीसाठी हत्येचा प्रयत्न; पानटपरीचालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 04:05 PM2018-09-04T16:05:29+5:302018-09-04T16:06:01+5:30

पान टपरी चालकाने ५०० रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न यशोधरानगरातील चार गुंडांनी केला. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

500 rupees worth of ransom in Nagpur; Paan shop owner severely injured | नागपुरात ५०० रुपयांच्या खंडणीसाठी हत्येचा प्रयत्न; पानटपरीचालक गंभीर जखमी

नागपुरात ५०० रुपयांच्या खंडणीसाठी हत्येचा प्रयत्न; पानटपरीचालक गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देचाकूने भोसकले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पान टपरी चालकाने ५०० रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न यशोधरानगरातील चार गुंडांनी केला. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. समीर अहमद जाकीर अहमद शेख (वय ३२) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यशोधरानगरातील आयेशा मशिदीजवळ समीर अहमद राहतो. त्याची राजीव गांधी नगरातील उड्डाणपुलाखाली पान टपरी आहे. सोमवारी दुपारी १२. ३० वाजता तो बसून असताना या भागातील गुंड समीर खान समशेर खान (वय २५) त्याच्या तीन साथीदारांसह पान टपरीवर आला. आरोपी खान याने समीरला पान टपरीच्या बाहेर बोलविले. नंतर त्याची कॉलर पकडून त्याला अश्लील शिवीगाळ केली. ५०० रुपये दे नही तो जान से मार दुंगा, असे आरोपी म्हणाला. समीरने पैसे नाही म्हणताच आरोपीने त्याच्या कंबरेत असलेला चाकू बाहेर काढून समीरच्या पोटात भोसकण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत समीर पलटला असता तो चाकू त्याच्या पाठीत खुपसला गेला. तशाही अवस्थेत जीव वाचविण्यासाठी समीर पळू लागला. आरोपी खान आणि त्याच्या तीन साथीदारांनी जखमी समीरचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यांनी त्याच्यावर पुन्हा चाकूचा वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समीरने जीवाची याचना करीत त्याच्याजवळचे ३०० रुपये आरोपीच्या हातात दिले. त्यामुळे पैसे घेऊन शिवीगाळ करीत आरोपी पळून गेले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. जखमी समीरला परिसरातील काही जणांनी डॉक्टरकडे पोहचविले. तेथून माहिती मिळाल्याने यशोधरानगर पोलिसांनी रुग्णालयात पोहचून समीरचे बयाण नोंदविले. त्यावरून आरोपी समीर खान समशेर खान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: 500 rupees worth of ransom in Nagpur; Paan shop owner severely injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून