५०० पथविक्रेत्यांनी केली नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:10 AM2021-08-12T04:10:35+5:302021-08-12T04:10:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ पथविक्रेत्यांना मिळवून देण्याच्या उद्देशाने मनपाच्या समाज विकास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ पथविक्रेत्यांना मिळवून देण्याच्या उद्देशाने मनपाच्या समाज विकास विभागांतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पाच दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात आतापर्यंत सुमारे ५०० पथविक्रेत्यांनी नोंदणी केली आहे.
सीताबर्डी येथील टेम्पल बाजार मार्गावरील स्व. पंडित रविशंकर शुक्ल हायस्कूल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑगस्टपर्यंत शिबिर आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत पथविक्रेत्यांना शिबिरामध्ये सहभागी होता येईल. यासाठी त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो, इलेक्ट्रिक बिल, अनुसूचित जाती व जमाती असल्यास जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे.
केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (पीएम स्वनिधी) अंतर्गत मनपा क्षेत्रातील पथविक्रेत्यांना व्यवसायाकरिता १० हजार रुपये भांडवल कर्ज दिले जात आहे. यासह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पथविक्रेत्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी केले आहे.