भटक्या-विमुक्त जमाती संघटनेचे आज नागपुरात ५० वे अधिवेशन; शरद पवार उपस्थित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 11:30 AM2022-10-08T11:30:06+5:302022-10-08T11:30:48+5:30

शरद पवारांना ‘जाणता राजा’ किताब देणार

50th Convention of Nomadic Tribes Association in Nagpur today; Sharad Pawar will attend the event | भटक्या-विमुक्त जमाती संघटनेचे आज नागपुरात ५० वे अधिवेशन; शरद पवार उपस्थित राहणार

भटक्या-विमुक्त जमाती संघटनेचे आज नागपुरात ५० वे अधिवेशन; शरद पवार उपस्थित राहणार

Next

नागपूर : भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन शनिवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले असून, त्याच्या समारोपीय सत्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ‘लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा’ हा किताब कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते होईल. दुपारी १२ वाजता संघटनेची वाटचाल आणि दिशा यावर, तर दुपारी २:३० वाजता वैदर्भीय भटक्या विमुक्तांवर चर्चा होईल. दुपारी ४ वाजता समारोपीय सत्र सुरू होईल.

विदर्भात संघटन बळकट करणार : लक्ष्मण माने

भटक्या विमुक्तांच्या मागण्यांकडे केंद्र शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे आजवर त्यांना न्याय मिळू शकला नाही. पश्चिम महाराष्ट्रात संघटनेने शेकडो मोर्चे काढून जनजागृती केली. विदर्भात मात्र आम्ही पोहोचू शकलो नाही. यापुढे विदर्भात संघटन बळकट करणार आहे, अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष, पद्मश्री 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी दिली.

आजपर्यंत सर्व आयोगांनी भटक्या विमुक्तांचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या शिफारस केल्या. परंतु केंद्र शासनाने या शिफारसी मान्य केल्या नाहीत. विदर्भातील संघटन बळकटीसोबतच या मुद्यांवर अधिवेशनात विचारमंथन होणार असल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दीपक मस्के, मिलिंद हिवरेकर आदी उपस्थित होते.

Web Title: 50th Convention of Nomadic Tribes Association in Nagpur today; Sharad Pawar will attend the event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.