५१ लाखाच्या बाईकची एलबीटी न भरताच विक्री

By admin | Published: September 10, 2015 03:41 AM2015-09-10T03:41:06+5:302015-09-10T03:41:06+5:30

एलबीटी रद्द झाल्यानंतर एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्याची मोहीम महापालिकेच्या एलबीटी विभागाने हाती घेतली आहे.

51 lakhs of bills sold without LBT | ५१ लाखाच्या बाईकची एलबीटी न भरताच विक्री

५१ लाखाच्या बाईकची एलबीटी न भरताच विक्री

Next

एलबीटी विभागाची धाड : दंडासह वसुली करणार
नागपूर : एलबीटी रद्द झाल्यानंतर एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्याची मोहीम महापालिकेच्या एलबीटी विभागाने हाती घेतली आहे. ५१ लाखाच्या बाईकची विक्री केली. परंतु एलबीटी न भरल्याने अभ्यंकरनगर येथील मे. सेंट्रल ट्रेड कार्पोरेशनवर विभागाच्या पथकाने बुधवारी धाड घातली.
मे. सेंट्रल ट्रड कार्पोरेशनने आॅक्टोबर २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान १०९ व एप्रिल ते जुलै २०१५ दरम्यान बॅटरीवर चालणाऱ्या १० बाईकची आयात केली. अशा ५१ लाखाच्या ११९ बाईक त्यांनी आयात केल्या. परंतु यावर त्यांनी एलबीटी भरलेला नाही.
राज्य सरकारने १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द केला आहे. सरकारच्या निर्णयानंतर कारवाई कशासाठी. असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. परंतु एलबीटी लागू असताना ज्यांनी तो भरलेला नाही. अशा व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वित्त वर्षात एक लाखाहून अधिक व्यवसाय असणाऱ्या व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणे आवश्यक आहे. परंतु याहून अधिक व्यवसाय असणाऱ्यांनी एलबीटीची नोंदणी केलेली नाही. तसेच त्यांनी एलबीटी भरलेला नाही. अशा व्यापाऱ्यांची यादी तयार केली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे.
मे. सेंट्रल ट्रेड कार्पोरेशनवर टाकलेल्या धाडीत पथकाने आवश्यक कागदपत्रे जप्त क ेली. कागदपत्राचा अभ्यास केल्यानंतर एलबीटीची रक्कम निश्चित करून वसुली केली जाणार आहे.
सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विभागाचे अधिकारी संजय मेश्राम, सहायक एलबीटी अधिकारी संजय दहीकर, जितेन्द्र तोमर, आमीर हुसेन, संजय मौंदेकर, सोमेश्वर पराते आदींनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)

Web Title: 51 lakhs of bills sold without LBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.