पर्यावरण जागृतीसाठी ५१ व्या वर्षी ‘सायकल यात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:59 AM2018-11-15T10:59:15+5:302018-11-15T11:00:18+5:30

साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे.

51 year old 'cycle travel' for environmental awareness | पर्यावरण जागृतीसाठी ५१ व्या वर्षी ‘सायकल यात्रा’

पर्यावरण जागृतीसाठी ५१ व्या वर्षी ‘सायकल यात्रा’

Next
ठळक मुद्देपाच राज्य ओलांडून श्री सम्मेद शिखरजीपर्यंत जाणारजैन नागरिकाचा असाही पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे. पर्यावरणासंबंधात जनजागृती करण्यासाठी त्यांनी सायकल यात्रेला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यादरम्यान ते पाच राज्यांची भूमी ओलांडणार असून झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी येथे या यात्रेचा समारोप होईल. अरविंद आगरकर जैन असे त्यांचे नाव असून त्यांचा उत्साह भल्याभल्यांना थक्क करणारा आहे.
मूळचे अकोला येथील असलेले अरविंद आगरकर जैन हे मागील अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करत आहेत. सोबतच जनआरोग्यासंदर्भातदेखील त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा सायकल यात्रादेखील आयोजित केल्या. यंदा मात्र त्यांनी जास्त मोठा पल्ला गाठण्याचा निर्धार केला व अकोल्यापासून ते थेट श्री सम्मेद शिखरजी गाठण्याचा संकल्प घेतला. या यात्रेदरम्यान ते पेट्रोल बचत तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत.
११ नोव्हेंबर रोजी अकोला येथील श्री शांतिनाथ चैत्यालय जैन मंदिर येथून त्यांच्या या यात्रेला सुरुवात झाली.
सायकल, आवश्यक ते सामान घेऊन ते तेथून निघाले. मंगळवारी रात्री ते नागपुरात आले व बुधवारी सकाळी लक्ष्मीनगर येथील भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथून पुढील प्रवासाकडे निघाले.

याअगोदरदेखील केल्या आहेत सायकलयात्रा
अरविंद आगरकर जैन यांनी याअगोदरदेखील अनेक सायकल यात्रा केल्या आहेत. नागपूर ते रामटेक, मुक्तागिरी, शिरपूर जैन सायकल यात्रा त्यांनी पूर्ण केली. आजच्या काळात आरोग्य व पर्यावरण दोघांकडेदेखील जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मात्र लोक याच महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करतात. याबाबतच जनजागृती करण्यासाठी मी हा पुढाकार घेतला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

१८ दिवसात हजार किलोमीटरचा प्रवास
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही सायकल यात्रा एकूण १८ दिवस चालणार आहे. यात ते जवळपास १७०० किलोमीटरचा प्रवास करतील. नागपूरहून आता ते रामटेक मध्य प्रदेशमधील शिवनी, लखनादौन, जबलपूर, खजुराहो, कटनी, सतना, रिवा, हनुमना, उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर, वाराणसी, चंदौली, मुगलसराय, बिहारमधील सासाराम, औरंगाबाद ,मदनपूर ,शेरघाटी, डोभी, बाराचट्टी, झारखंड राज्यातील चौपारण, बरही, बरकठा , बागोदर, डुमरी, गिरिडिह, पारसनाथ या मार्गाने श्री सम्मेद शिखरजी येते पोहोचतील.

Web Title: 51 year old 'cycle travel' for environmental awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.