मेट्रो रेल्वेसाठी जाणार ५२४ झाडांचा बळी

By admin | Published: September 18, 2016 02:30 AM2016-09-18T02:30:57+5:302016-09-18T02:30:57+5:30

शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.

524 victims of Metro rail will be killed | मेट्रो रेल्वेसाठी जाणार ५२४ झाडांचा बळी

मेट्रो रेल्वेसाठी जाणार ५२४ झाडांचा बळी

Next

वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी : पारडी उड्डाण पुलासाठी ५०४ झाडे तोडणार
नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक यंत्रणा सक्षम होणार आहे. परंतु यासोबतच शहरातील हिरवळीचे नुकसानही होणार आहे. मेट्रो रेल्वेच्या मार्गात येणारी ५२४ झाडे तोडण्याची अनुमती मागण्यात आली होती. याला महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने शनिवारी मंजुरी दिली आहे. तसेच मार्गात येणारी ३८ झाडे दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समितीच्या बैठकीत मेट्रो रेल्वेला झाडे तोडण्याची अनुमती देण्यात आली. परंतु या मोबदल्यात त्यांना २७८५ झाडे लावावी लागणार आहे. याची हमी म्हणून ३० लाख ७३ हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्यात आले आहे. यासोबतच शहराच्या इतर भागातील झाडे तोडण्याला मंजुरी देण्यात आली. यात गैरप्रकार होऊ नये यासाठी झाडे तोडण्याचे काम महानगरपालिकेकडे नोंदणी असलेल्या कंत्राटदारांकडूनच करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले.
पारडी चौकात सुरू असलेल्या उड्डाण पुलासाठी ५०४ झाडे तोडावी लागणार आहे. तसेच येथील ६८ झाडे दुसरीकडे लावण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाकडून आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर या प्रस्तावाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.(प्रतिनिधी)

४४ झाडे तोडून प्लॅटफॉर्म
मध्य रेल्वेच्या इतवारी रेल्वे स्टेशनवर नवीन प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या जागेवर असलेली ४४ झाडे तोडावी लागणार आहे. यासाठी रेल्वे विभागाकडून अनुमती मागण्यात आली होती. समितीने याला मंजुरी दिली.

विविध ठिकाणची झाडे तोडणार
रामझुला टप्पा दोनसाठी चार झाडे तोडण्याला मंजुरी.
मेयो रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी १७ झाडे तोडण्याला मंजुरी.
लकडगंज पोलीस स्टेशनच्या निवासी संकुल बांधकामासाठी ३३ झाडे तोडण्याला मंजुरी.
दूरदर्शन केंद्राच्या नवीन रेडिओ स्टेशनच्या बांधकामासाठी तीन झाडे तोडण्याला मंजुरी.
पोलीस लाईन टाकळी येथे गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या बांधकामासाठी २० झाडे तोडण्याला मंजुरी.
सुरेश भट सभागृहाच्या बांधकामात बाधा निर्माण झाल्याने एक झाड तोडण्याला मंजुरी.

Web Title: 524 victims of Metro rail will be killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.