५३ तरुणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:11+5:302021-08-18T04:12:11+5:30
रामटेक : भंडारबाेडी (ता. रामटेक) येथील प्राथमिक आराेग्य केंद्र, ओबीसी मुक्ती मोर्चा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, तालुका कृषी ...
रामटेक : भंडारबाेडी (ता. रामटेक) येथील प्राथमिक आराेग्य केंद्र, ओबीसी मुक्ती मोर्चा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, तालुका कृषी विभाग, ग्रामपंचायत कार्यालय भंडारबाेडी व शिवनी (भाेंडकी) यांच्या संयुक्त विद्यामाने भंडारबाेडी येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ५३ तरुणांनी रक्तदान केले.
तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी स्वत: रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे नितीन चौधरी, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार, तुषार पेंढारकर, राम वाडीभस्मे, कैलास राऊत, दामोधर धोपटे, बबलू बर्वे, राहुल कोठेकर, नरेशचंद्र मरकाम, वैद्यकीय अधिकारी डाॅ. शरयू राहाटे उपस्थित हाेते. याप्रसंगी भंडारबोडीच्या सरपंच प्रतिभा मडावी, शिवनी(भोंडकी)चे सरपंच विजय भुरे, संतोष साकोरे, आशिष थोटे, सरपंच विजय भुरे, महेंद्र दिवटे, कृष्णा पाटील यांनी भंडारबाेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण केले. नागपूर शहरातील साईनाथ ब्लड बँकेच्या चमूने रक्त संकलन केले.