युद्धाच्या काळात सोने ५३ हजारांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2022 07:00 AM2022-03-06T07:00:00+5:302022-03-06T07:00:07+5:30

Nagpur News २४ फेब्रुवारीला सोन्याचे दर यावर्षी ५३ हजारांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले, तर चांदीने ५ मार्चला ६९ हजार ३०० रुपयांवर उसळी घेतली. दोन्ही मौल्यवान धातू किमतीचे उच्चांक गाठणार काय, या संभ्रमामुळे ग्राहकांची खरेदी वाढली.

53,000 gold during war! | युद्धाच्या काळात सोने ५३ हजारांवर!

युद्धाच्या काळात सोने ५३ हजारांवर!

Next
ठळक मुद्देयुद्ध थांबल्याने भाव कमी होण्याची शक्यता

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : युद्धाच्या दहा दिवसांच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरतेमुळे देशात सोने-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार झाली. २४ फेब्रुवारीला सोन्याचे दर यावर्षी ५३ हजारांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले, तर चांदीने ५ मार्चला ६९ हजार ३०० रुपयांवर उसळी घेतली. दोन्ही मौल्यवान धातू किमतीचे उच्चांक गाठणार काय, या संभ्रमामुळे ग्राहकांची खरेदी वाढली. दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव पुढे किती वाढतील, याचा अंदाज लावणे कठीण असल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.

एकाच दिवसात सोने अडीच हजार, तर चांदीत ४ हजारांची वाढ

शनिवार, ५ मार्चला दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५२,८००, तर चांदी प्रती किलो ६९,३०० रुपयांवर पोहोचली. यापूर्वी २३ मार्चला सोने ५०,५०० रुपये, तर चांदीचे दर ६५,१०० रुपये होते. पण २४ फेब्रुवारीला युद्ध सुरू होताच सोन्यात अडीच हजारांची वाढ होऊन ५३ हजार आणि चांदी ४ हजारांची वाढ होऊन भाव ६९ हजारांवर पोहोचला. २५ फेब्रुवारीला सोन्यात १७०० रुपये आणि चांदीत ३ हजार तसेच २६ रोजी अनुक्रमे ७०० रुपये आणि ९०० रुपयांची घसरण झाली. २८ रोजी सोने ७०० रुपये आणि चांदीत ४०० रुपयांची वाढ झाली. १ मार्चला सोन्यात ३०० रुपयांची वाढ आणि चांदीत १०० रुपयांची घसरण झाली. २ मार्चला सोन्यात ४०० रुपये आणि चांदीत १९०० रुपयांची वाढ झाली. ३ रोजी सोन्यात १०० रुपयांची घसरण आणि चांदीत ५०० रुपयांची वाढ, ४ रोजी सोने-चांदी अनुक्रमे ६०० आणि २०० रुपयांनी वधारले. ५ मार्च रोजी सोने ३०० रुपयांनी वाढून ५२,८०० आणि चांदी ३०० रुपयांनी वधारून ६९,३०० रुपयांवर पोहोचली. १० दिवसांतील चढउतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

वाढत्या दरासोबतच ग्राहकांची सोने-चांदीची खरेदी वाढली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने लोक सोने खरेदी करीत आहेत. आणखी दरवाढीच्या शक्यतेमुळे ग्राहकांना सोने खरेदीची संधी आहे. दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.

 

सोने-चांदीच्या चढउताराचा तक्ता :

दिनांक सोने चांदी

२३ फेब्रु. ५०,५०० ६५,१००

२४ फेब्रु. ५३,००० ६९,०००

२५ फेब्रु. ५१,३०० ६६,०००

२६ फेब्रु. ५०,६०० ६५,१००

२८ फेब्रु. ५१,३०० ६६,३००

१ मार्च ६१,६०० ६६,५००

२ मार्च ५२,००० ६८,३००

३ मार्च ५१,९०० ६८,८००

४ मार्च ५२,५०० ६९,०००

५ मार्च ५२,८०० ६९,३००

Web Title: 53,000 gold during war!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं