५४ शाळा अनधिकृत
By admin | Published: June 22, 2016 02:55 AM2016-06-22T02:55:31+5:302016-06-22T02:55:31+5:30
शासन मान्यता नसतानाही जिल्ह्यात अनधिकृतपणे ५४ शाळा सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे.
शासनाची मान्यता नाही : प्रवेश घेतल्यास धोका
नागपूर : शासन मान्यता नसतानाही जिल्ह्यात अनधिकृतपणे ५४ शाळा सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे. या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपक लोखंडे यांनी केले आहे.
नागपूर शहरात २० अनधिकृत शाळा असून यात हनी कॉन्व्हेंट नागसेननगर , अफसर इंग्लिश प्रायमरी स्कूल नजफ कॉलोनी, के.जी.एन. पब्लिक स्कूल पोलीस लाईन टाकळी , एस.के.बी. स्काय बर्ड कॉन्व्हेंट पिवळी नदी , दिवाण कॉन्व्हेंट भांडेवाडी , राजीव कॉन्व्हेंट लालगंज , एस.के.बी.स्काय बर्ड कॉन्व्हेंट यशोधरानगर , एलिझाबेथ कॉन्व्हेंट सेमिनरी हिल्स , न्यू रेहमानिया इंग्लिश प्रायमरी स्कूल मोमीनपुरा , वंडर फुल स्कूल जुनी मंगळवारी , सप्तगिरी कॉन्व्हेंट मेडिकल, कमल कॉन्व्हेंट अॅण्ड स्कूल चंद्रमणीनगर , डब्ल्यू.एस.एस.सी बालक मंदिर अजनी , बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल जयप्रकाशनगर बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल रामेश्वरी, इकरा पब्लिक स्कूल ताजबाग, सक्सेस पॉईंट कॉन्व्हेंट दिघोरी , न्यू पॅराडाईज कॉन्व्हेंट वैशालीनगरव शकुंतला पब्लिक स्कूल आवळेनगर आदींचा समावेश आहे.
ग्रामीणच्या २४ शाळांचा समावेश
न्यू माऊंट कॉन्व्हेंट प्राथमिक शाळा सावरगांव ता. नरखेड, गोमुख विद्यानिकेतन कॉन्व्हेंट नांदागोमुख ता. सावनेर, बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल येरखेडा ता. कामठी, सेंट्रल प्रोव्हीडेंस पब्लिक स्कूल मौदा, रेड्डी कॉन्व्हेंट कोदामेंढी ता. मौदा, त्रिमृर्ती पब्लिक कॉन्व्हेंट बाजारगांव, वसुंधरा कॉन्व्हेंट अॅण्ड इंग्लिश प्रायमरी स्कूल बाजारगांव, प्रियदर्शिनी स्कूल बाजारगांव, गुरुकुल पब्लिक स्कूल बुटीबोरी, वृंदा विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल बुटीबोरी, नालंदा नॉन रेसिडेंस स्कूल रुईखैरी, विंग्स कॉन्व्हेंट फेटरी, द मिलेनियम स्कूल फेटरी, डिव्हाईन प्रोव्हिडेंस स्कूल फेटरी, गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल गुमथळा, एस.एन. पब्लिक स्कूल गोधनी रेल्वे, बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल गोधनी, डॉल्फीन स्कूल गोधनी रेल्वे, शांती कॉन्व्हेंट म्हाडा कॉलनी गोधनी रेल्वे, ब्राईट स्टार कॉन्व्हेंट अॅण्ड स्कूल सालई गोधनी, तथास्तू इंग्लिश स्कूल बेलतरोडी, न्यू स्टार पब्लिक स्कूल सोनबानगर, बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल वाडी, द रेडीयन्स स्कूल धनगरपुरा हिंगणा, न्यू प्रेरणा कॉन्व्हेंट टाकळघाट, ब्रिलीयंट इंग्लिश स्कूल भगीरथ पार्क वानाडोंगरी, सार्थक इंग्लिश स्कूल गजानन नगर हिंगणा, यू.डी बलकोटे प्रायमरी स्कूल लोकमान्य नगर डिगडोह, लिटल एंजल कॉन्व्हेंट पांडुरंग नगर डिगडोह (देवी), बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल इसासनी, गुरुकुल पब्लिक स्कूल वडधामना, वृंदावन कॉन्व्हेंट आपतूर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कॉन्व्हेंट सिरसी, मातोश्री प्रायमरी स्कूल कुही आदी शाळांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)