वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वेमार्गासाठी ५४१ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 07:05 AM2022-02-03T07:05:00+5:302022-02-03T07:05:01+5:30

Nagpur News विदर्भाच्या सर्वांगीण विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड या २७० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी यावेळी ५४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

541 crore for Wardha-Yavatmal-Nanded new railway line | वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वेमार्गासाठी ५४१ कोटींचा निधी

वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वेमार्गासाठी ५४१ कोटींचा निधी

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य सरकारकडून २७९ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा

आनंद शर्मा / दयानंद पाईकराव

नागपूर : विदर्भाच्या सर्वांगीण विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड या २७० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी यावेळी ५४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, रेल्वेने आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या पिंक बुकच्या डेटावरून २०२२-२३ मध्ये राज्य सरकारकडून २७९ कोटी रुपयांचा वाटा मिळण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. यामुळे या बहुप्रतिक्षित रेल्वेमार्गाच्या कामाचे इंजिन लवकरच वेग पकडेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भातील रेल्वे मार्ग प्रकल्पांचीही दखल घेण्यात आली आहे. यामुळे येत्या काही वर्षांत विदर्भासह राज्यातील आणि देशातील नागरिकांसाठी रेल्वेचे आणखी मजबूत जाळे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे मार्ग प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत, हे विशेष. २०१५ मध्ये वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग मंजूर झाला आणि पुढील वर्षापासून या प्रकल्पाचे काम थेट सुरू होऊ शकले, हे त्यांच्या प्रयत्नांचे फळ आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेला निधी आणि राज्य सरकारकडून आवश्यक असलेला निधी यातून भूसंपादनासंबंधीच्या अडचणी संपतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊन विदर्भासह राज्याचा विकास निश्चित होणार आहे.

या रेल्वे प्रकल्पांना मिळाला फंड

-राजनांदगाव-नागपूर थर्ड लाईन (२२८ किमी) : ६४१ कोटी

-इटारसी-नागपूर थर्डलाईन (२८० किमी) : ६१० कोटी

-वर्धा-नागपूर थर्ड लाईन (७६.३ किमी) : ८७ कोटी

-वर्धा नागपूर फोर्थ लाईन (७८.७० किमी) : १३० कोटी

-वर्धा-बल्लारशाह थर्ड लाईन (१३२ किमी) : ३०५ कोटी

-वडसा-गडचिरोली नवी लाईन (४९.५ किमी) : ८० कोटी

-छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईन (१४९.५ किमी) : २९ कोटी

-अमरावती-नरखेड नवी लाईन (१३८ किमी) ३ कोटी

रेल्वेमंत्र्यांनी शब्द पाळला : दर्डा

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी निधी दिल्याबद्दल मी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव व वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा आभारी आहे. या प्रकल्पासाठी मी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती. तेव्हाच त्यांनी हा प्रकल्प रखडणार नाही, पुरेसा निधी दिला जाईल, असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला याचा आनंद आहे. खरेतर आणखी मोठी अपेक्षा होती. कारण, प्रकल्प जितका काळ रखडत जाईल तितकी त्याची किंमत वाढत जाईल.

- विजय दर्डा,

माजी खासदार, राज्यसभा तसेच चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड

Web Title: 541 crore for Wardha-Yavatmal-Nanded new railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.