पाच दिवसांत कोरोनाचे ५५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:03+5:302021-09-24T04:09:03+5:30
नागपूर : कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार असला तरी मागील पाच दिवसांत ५५ रुग्णांची भर पडली. गुरुवारी १२ नव्या रुग्णांची ...
नागपूर : कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार असला तरी मागील पाच दिवसांत ५५ रुग्णांची भर पडली. गुरुवारी १२ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची एकूण संख्या ४,९३,२४३ झाली. मागील सात दिवसांत एकही मृत्यू नाही. मृतांची संख्या १०,१२० वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात गुरुवारी ४,६३६ कोरोना संशयित रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात शहरातील ३,३२९ तर ग्रामीणमधील १,३०७ तपासण्या होत्या. त्या तुलनेत शहरात ९, ग्रामीण भागात २ तर जिल्ह्याबाहेरील १ बाधित रुग्ण आढळून आला. शहरात आतापर्यंत ३,४०,२३३ रुग्ण व ५,८९३ मृत्यू, ग्रामीणमध्ये १,४६,१६९ रुग्ण व २,६०३ मृत्यू तर जिल्ह्याबाहेर ६,८४१ रुग्ण व १,६२४ मृत्यूची नोंद झाली. आज १३ रुग्ण कोरोनातून बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ४,८३,०३२ वर पोहचली आहे. सध्या कोरोनाचे ९१ रुग्ण सक्रिय आहेत. यात शहरातील ६२, ग्रामीण मधील २२ तर जिल्ह्याबाहेरील ७ रुग्ण आहेत. आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये ३० रुग्ण भरती आहेत. उर्वरित रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात दाखल आहेत.
-लक्ष्मीनगर मधील ३ तर सतरंजीपुरा मध्ये ४ रुग्ण
मागील २४ तासांत पॉझिटिव्ह आलेल्या शहरातील रुग्णांमध्ये लक्ष्मीनगर झोनमधील ३, सतरंजीपुरा झोनमधील ४, हनुमाननगर व लकडगंज झोनमधील प्रत्येकी १ असे एकूण ९ रुग्ण आढळून आले. मागील २३ दिवसांत सर्वाधिक रुग्णांची नोंद लक्ष्मीनगर झोनमध्ये झाल्याचे दिसून येत आहे.
-रुग्णसंख्येचा चढउतार
१९ सप्टेंबर : ४ रुग्ण
२० सप्टेंबर : १३ रुग्ण
२१ सप्टेंबर : १० रुग्ण
२२ सप्टेंबर : १६ रुग्ण
२३ सप्टेंबर : १२ रुग्ण
:: कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ४,६३६
शहर : ९ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : २ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९३,२४३
ए. सक्रिय रुग्ण :९१
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८३,०३२
ए. मृत्यू : १०,१२०